अनन्या पांडेला बॉलिवूडमधील सर्वात क्यूट अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यास ती यशस्वी ठरली आहे. पण अनन्याला दररोज सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. अनन्या या ट्रोलिंगवर फारसे लक्ष देत नाही, स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यास तिचे प्राधान्य आहे. अलिकडेच एका टॉक शोमध्ये अनन्याने ट्रोलिंगसंबंधी स्वतःची भूमिका मांडली आहे.
अनन्याला अनेकदा स्ट्रगलिंग दीदी म्हणून संबोधिले जाते तसेच तिच्या ऍसेंटची थट्टा केली जाते. एका चाहत्याने तिचे ऍसेंट ऐकून लोकांच्या कानांमधून रक्त येऊ लागते असे म्हटले. यावर अनन्याने तितकेच सडेतोड प्रत्युत्तर दिले. मी याकरता माफी मागे, मी तुमच्यासाठी टिश्यू देखील पाठविते असे तिने म्हटले आहे.
अनन्याला नेपोटिज्मवरूनही नेहमी ट्रोल केले जाते. केवळ माझे वडिल अभिनेते आहेत, म्हणून मी अभिनय करण्याच्या संधीला नाकारू शकत नाही. माझ्यासाठी चित्रपटांमध्ये काम करणे कधीच सोपे नव्हते असे तिने म्हटले आहे.
अनन्याने 2018 मध्ये करण जौहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘पती पत्नी आणि वो’ ‘खाली पीली’ या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. लवकरच ती ‘लायगर’ चित्रपटामधून पेक्षकांच्या भेटीला येणार आहे.