कोरोनाशी लढण्यास मदत : आरोग्य व शिक्षणावर खर्च करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मायक्रो ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्कमध्ये कार्यरत असणारी कंपनी ट्विटर आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकरी जॅक डॉर्सी आपल्या एकूण संपत्तीमधील 28 टक्के वाटा म्हणजे 7500कोटी रुपये कोरोनाशी लढण्यास दान करणार आहे, असल्याची घोषणा केली आहे. ही संपत्ती समाज कार्यासाठी देणार असल्याचेही डॉर्सी यांनी ट्विटवर पोस्ट करुन सांगितले आहे.
डॉर्सीने स्टार्ट स्मॉल फाउंडेशनला आपल्या संपत्तीमधील 7500 कोटी रुपये देणार आहे. हा संपूर्ण मदत निधी कसा खर्च करण्यात येणार आहे. यांचीही माहिती सविस्तरपणे दिली आहे. यांच्यासाठी ट्रेकिंग सुविधा दिली असून याचा वापर करुन जगाच्या कोणत्याही भागातून यांचा तपशील पाहता येण्याची सोय केली आहे. यासाठी जॅक डॉर्सीने एक लिंकही सादर केली आहे. तर शिक्षण आरोग्य यावर हा खर्च करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
अन्य टेक कंपन्यांचे दान
w या अगोदर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी 227 कोटी रुपयाचे दान देण्याची घोषणा केली आहे. हा सर्व निधी कोरोनाशी लढण्यास देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
w ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी कोरोना संकटात गरीबांना अन्नपाणी व अन्य मदत करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे.
w ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकरी टिम कुक यांनी मार्च महिन्यातच घोषणा केली आहे, की ते इटलीला मेडिकलची सर्व प्रकारची मदत करणार आहे.