ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने पुन्हा एकदा लोकेशनमध्ये चूक केली आहे. ट्विटर इंडियाने लाईव्ह लोकेशनमध्ये (जिओ टॅग) जम्मू-काश्मीरला चीनचा भाग दाखवला आहे. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या (ओआरएफ) कांचन गुप्ता यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.
ट्विटरने या विषयावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, चुकीच्या लाईव्ह लोकेशनची रविवारी आम्हाला जाणीव झाली. तो तांत्रिक दोष होता. आपण या विषयाची संवेदनशीलता समजून करतो. जिओटॅग (लोकेशन) दोष आमच्या टीमने ताबडतोब काढून टाकला आहे. दरम्यान, ट्विटरने या चुकीबद्दल अद्याप माफी मागितलेली नाही.
लेह येथील वॉर मेमोरियलवर काही पत्रकारांनी ट्विटरवर थेट प्रक्षेपण केले तेव्हा ट्विटरची चूक लक्षात आली.