ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी मागील काही दिवसांपासून टीम पासून दूर आहेत. धोनी मागील वर्षी जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये झालेला वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा जोरदार सुरू झाली. मात्र, स्वतः धोनीने असा कोणताही निर्णय घेतला नाही आहे.
त्यातच आता बुधवार पासून परत अचानक सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्ती संदर्भात #DhoniRetires शब्द ट्रेडिंग मध्ये आला आहे. त्यानंतर भावूक होऊन नाराजी देखील वर्तवली आहे. तर काही चाहत्यांनी धोनीचे जुने फोटो आणि व्हिडिओ वायरल करण्यास सुरुवात केली आहे.
38 वर्षीय धोनीची निवृत्तीची चर्चा सोशल मीडियावर होण्याची पहिलीच वेळ नाही आहे. धोनीला आयपीएल मधून टीम इंडियामध्ये परत यायचे होते. पण कोरोनामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, धोनीने टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला आहे.