ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर पोस्ट करण्यासाठी सध्या 280 शब्दांची मर्यादा आहे. पण युजर्सना स्वत:ला सहज आणि पूर्णपणे व्यक्त करता यावं, यासाठी ट्विटर ही शब्दमर्यादा वाढवण्यावर सध्या काम करत आहे. ट्विटर ”ट्विटर आर्टिकल्स” या नव्या फीचरवर काम करत असून, युजर्संना लांबलचक मेसेजेस पोस्ट करता येणार असल्याचा दावा जेन मनचुन वोंग या सुरक्षा संशोधकाने केला आहे.
जेव्हा ट्विटरने 2006 मध्ये पहिल्यांदा ॲप लाँच केले, तेव्हा ते ट्विट 140 शब्दांपुरते मर्यादित होते, जे बऱ्यापैकी प्रतिबंधात्मक होते. पण 2018 मध्ये ट्विटरने ही मर्यादा दुप्पट करून 280 शब्दांपर्यंत वाढवली, जेणेकरून युजर्सना स्वत:ला व्यक्त करणं सोपं जाईल. पण आता युजर्सला आपले मोठे लेख कसे ट्विट करता येतील, याची ट्विटरकडून चाचणी सुरू आहे.