टुनिस
जगभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून याचा फटका टय़ुनिशियाला सर्वाधिक बसला आहे. अलीकडेच टय़ुनिशियात एकाच दिवसात 10 हजार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे एकाच दिवशी 134 जणांनी दम तोडला आहे. यासाठी देशातील आरोग्य यंत्रणेवर या साऱयाचे खापर फोडले जात आहे. प्रत्यक्षात पाहता देशातील आरोग्य यंत्रणा वाऱयावर आहे, हे मात्र खरे आहे. उत्तर आफ्रिकेतील या देशात कोरोनाने पुन्हा जलदगतीने प्रसाराला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा सामना सामान्यांना करावा लागतो आहे. कोरोना रुग्णांना व मृतांना हाताळण्यासाठी विविध इस्पितळात आरोग्य कर्मचाऱयांचा तुटवडा जाणवतो आहे. देशातील 6 भाग संपूर्ण लॉकडाऊनखाली आहेत. लसीकरण कमी वेगाने होत असून ऑक्सिजनचा तुटवडाही देशाला जाणवतो आहे.