वृत्तसंस्था/ लंडन
डब्ल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या बर्मिंगहॅम खुल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत टय़ुनेशियाच्या ऑन्स जेबॉरने एकेरीचे जेतेपद मिळविताना रशियाच्या कॅसेटकिनाचा पराभव केला.
डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धा जिंकणारी जेबॉर ही पहिली अरब महिला टेनिसपटू ठरली आहे. द्वितीय मानांकित जेबॉरने अंतिम सामन्यात कॅसेटकिनाचा 7-5, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद हस्तगत केले.