1970-71 बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पुनर्मीलन सोहळय़ात शाळेतील जुन्या आठवणींना दिला उजाळा
प्रतिनिधी /बेळगाव
ठळकवाडी हायस्कूलचा 1970-71 बॅचचा सुवर्ण पुनर्मीलन सोहळा नुकताच पार पडला. प्रकाश नाडगौडा यांनी प्रास्ताविक केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. माजी शिक्षक एम. आर. कुलकर्णी, एम. डी. कौजलगी, मुख्याध्यापक कुडतुरकर, माजी विद्यार्थी अशोक देसाई, दीपक वेर्णेकर, गंगाधर साबोजी, बाहुबली गरगट्टी यांनी दीप प्रज्वलन केले.
दिवंगत गुरूजन व विद्यार्थ्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. भास्कर शिदोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उमेश आजगावकर, भानुदास कोसंदल, प्रभा दळवी-आईगळ, वर्धमान लेंगडे, शेखर पवार, मुक्ता अंगडी-अंटीन, विजय बिच्चू, श्रीधर काजरेकर, सुरेखा नाबर-देसाई यांनी माजी शिक्षकांचा, पाहुण्यांचा सत्कार केला.
यावेळी प्रकाश फडणीस, अंजली जोशी-भोबे, धनंजय गाडगीळ, गिरीष हंदीगोळ, रमा कित्तूर-मोहे, मुक्ता अंगडी मोहे, नारायण जवळकर यांनी आपापल्या मनोगताने शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. एम. आर. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कुडतुरकर यांनी या बॅचने शाळेसाठी केलेल्या उपक्रमाबद्दल आभार मानले. गजानन शिंदे यांच्या आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने समारोप झाला. न्यू उदय भुवनमध्ये सहभोजनाने पुनर्मीलन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.