काहींच्या पोटर्यांवर, मांडय़ांवर निळसर वाहिन्यांचे जाळे गडद झालेले दिसते. तट्ट फुगलेल्या शीरा वेदना देत राहतात. चाळिशीनंतरच्या स्त्रियांमध्ये पुरूषांपेक्षा या व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास अधिक होताना दिसतो.
- पायातून अशुद्ध रक्त हृदयाकडे जाताना वाटेतल्या झडपा सैल होतात आणि रक्त पुन्हा खालच्या बाजूकडे वळते. त्यावेळीच खालूनही वर रक्त सरकत असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येऊन त्या फुगू लागतात.
- केवळ दिवसायला वाईट एवढेच हे दुखणे नसते. त्यामुळे पायात जडपणा येऊ लागतो. पायांना सूज येते. वेदना होतात. पोटर्यात गोळे येतात.
- यावर उपाय काय?
- सतत नुसतेच उभे राहून काम करणे टाळा.
- अधूनमधून कदमताल करा.
- चवडय़ांवर उभे राहा.
- कमरेला घट्ट बसणारे कपडे, पट्टे टाळा.
- पायांची अढी घालून बसून नका. पाय उंचावर ठेवून बसा.
- पाण्यात चालण्याचा व्यायाम खूप उपयुक्त ठरेल.
- झोपताना पायाखाली उशी घ्या.
- झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्यात बुडवा. पाय गरम झाल्यावर थंड पाण्यात बुडवा. पुन्हा गरम पाण्यात रक्तप्रवाहाचा वेग वाढू द्या. मग हलक्या हाताने पायांना खालपासून वरपर्यंत समाज करा.
- हे उपाय प्राथमिक स्तरावरचे आहेत. या उपायांनी फरक न पडल्यास तज्ञ डॉक्टरांचे उपचार घेणे आवश्यक आहे.