दोडामार्ग / वार्ताहर:
साटेली – भेडशी व तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत ,खासदार विनायक राऊत ,आमदार दीपक केसरकर ,आमदार वैभव नाईक आदी पदाधिकाऱ्यांचे दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी रुग्णवाहिकेचे ओरोस येथे वितरण प्रसंगी आभार मानले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकांचे वाटप पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. यावेळी साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त रुग्णवाहिकेचेही वितरण करण्यात आले. त्यावेळी दोडामार्गचे सेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, जि. प. सदस्या संपदा देसाई, पं. स. उपसभापती सुनंदा धर्णे, सरपंच सेवासंघ जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, उपजिल्हासंघटक गोपाळ गवस, विभागप्रमुख संतोष मोर्ये, युवासेना उपतालुकप्रमुख भगवान गवस, महिलाआघाडी उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, साटेली – भेडशी उपसरपंच गणपत डांगी आदी उपस्थित होते.