ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी गेले 10 दिवस कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे…तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होईन, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.