शिवसंग्रामच्या विनायक मेटेंचा आघाडी सरकारला खोचक टोला
सावंतवाडी/प्रतिनिधी –
महाविकास आघाडी सरकारला आरक्षणाविषयी काहीही देणं घेणं नाही. कारण मराठा समाजाला आरक्षण देण्याची आत्ताच्या सरकारची इच्छाच नाही. शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दलही हे सरकार उदासीन आहे. ठाकरे सरकार हे फॅमिली सरकार असून त्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्या नात्यातील मंत्र्यांचाच गोतावळा आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची जी गैरप्रकरणं बाहेर येताहेत हे पाहिल्यावर काही दिवसात अख्ख्या मंत्रिमंडळाची बैठक जेलमध्ये आयोजित करतील असं वाटू लागलंय असा खोचक टोला शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी आघाडी सरकारला लगावला.सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.