प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात सध्या पश्चिम भागात भुयारी गटरचे काम सुरू आहे. या कामात अनेक त्रुटी आहेत. हे काम करणारा लेबर कॉन्ट्रक्टर राठोड याची ‘तरुण भारत’च्या बातमीने चांगलीच सटकली आहे. चक्क त्याने सामजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समजते. नागाच्या पार येथे भुयारी गटरमुळे पडलेले भगदाड आमच्यामुळे नाही, असा दावा करत पत्रकाराचेच फोटो काढणाऱया लेबर कॉन्ट्रक्टरने बातमीवरून थेट सामाजिक कार्यकर्त्यालाच जीवे मारण्याची धमकी दिली.
सातारा शहरात पावसाळ्यात रस्ते भुयारी गटरच्या कामांसाठी लेबर कॉन्ट्रक्टर राठोड याने खोदले आहे. त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले नाही. चेंबरची उंची ठेवण्यात आली आहे. गणपती उत्सव जवळ आल्याने किमान रस्ते तरी चांगले करावेत, अशी मागणी सातारकर नागिरकांची आहे. त्यातच नागाचा पार येथील भुयारी गटरच्या कामांमुळे रस्त्यात ओढय़ालगतच्या बाजूला खचले आहे. त्यामुळे धोकादायक बनण्याची शक्यता असल्याने ‘तरुण भारत’ने फोटो काढल्याची माहिती लेबर कॉन्ट्रक्टर राठोड याला मिळाली. त्याने फोन करून तेथे सोमवारी बोलवले. कुठं खड्डा पडला ते दाखवा म्हणून तर खड्डय़ा ऐवजी पत्रकाराचे फोटो काढून आमच्यामुळे खड्डा नाही पडला असे सांगू लागला.
‘तरुण भारत’ने तेथील नागरिकांच्या तक्रारीनुसार बातमी करण्यात आली. त्यामुळे राठोड यांनी मंगळवारी चांगलीच तणतण केली. एका सामाजिक कार्यकर्त्याने भुयारी गटरच्या कामाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केल्याच्या रागातून मंगळवार तळे परिसरात जीवे मारण्याची धमकी त्याने दिल्याचे अनेकांनी पाहिले. त्या कार्यकर्त्यांने याबाबतची तक्रार सहपोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्याकडे केल्याचे समजते. मात्र, रस्त्यावर पडलेले खड्डे अद्याप तसेच आहेत.
करायला गेला गणपती झाला मारुती
याच लेबर कॉन्ट्रक्टरने पाठीमागे पालिकेच्या एका पदाधिकाऱयाला मोबाईल फोनवरून जाळ्यात अडकवण्याचा त्याच्या कार्यकर्त्यांकरवी प्रयत्न केला होता. यावेळी ही त्याने असाच प्रयत्न करण्याचा प्रकार केला. खड्डा बुजवतो हे सांगणे बाजूला ठेवून पत्रकारांचेच फोटो काढायला सांगून कशी पत्रकारांची जिरवतो हे दाखवून देत होता. वास्तविक दोन्ही महाराजांचे नाव सांगून निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱया राठोड सारख्याला मूळ ठेकेदार काम देतो त्यामुळेच वेळेत चांगले काम होत नाही. अद्याप खड्डा भरला गेला नाही, त्यामुळे अशा व्यक्तीवर पालिकेकडून नेमकी काय कारवाई होणार अशी चर्चा सुरू आहे.