जगभर ‘कोविड-19’ची साथ पसरल्याचे खापर चीनवर फोडण्यात सगळ्यात पुढे असणाऱया ट्रम्प महाशयांनी चीनचा अमेरिकेतील एक दूतावास बंद करण्याचा आदेश देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणातील नवा अध्याय सुरू केला आहे. ह्यूस्टन या शहरातील हा दूतावास बंद करण्याचा आदेश मंगळवारी देताना चीनला 72 तासांची मुदत देण्यात आली. हे 72 तास पूर्ण होण्याच्या आत चीननेही चंगडू येथील अमेरिकन दूतावास बंद करण्याचा आदेश देऊन सणसणीत प्रतिटोला दिला.
‘कोविड-19ची साथ आल्यापासून या रोगाचा उगम चीनमध्ये आहे असे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बौद्धिक संपदांचे रक्षण करण्यासाठी ह्यूस्टनचा चिनी दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकेने जाहीर केले. दोन चिनी नागरिकांनी काही कंपन्यांच्या संगणकात शिरकाव करून माहिती पळवण्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे. ‘अनेक वर्षांपासून चीनची अमेरिकेत हेरगिरी सुरू आहे. अलीकडे तिचे प्रमाणही वाढले आहे आणि हेरगिरी करण्याच्या क्षेत्रांची व्याप्तीही वाढली आहे’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मॉर्गन ओर्टागस यांनी सांगितले. हा आदेश देण्यात आला तेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माइक पोम्पिओ डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे होते.
अमेरिकेत चीनचे एकूण 6 दूतावास आहेत. मुख्य दूतावास राजधानी वॉशिंग्टनमध्ये आणि उर्वरित पाच अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये आहेत. न्यूयॉर्क, शिकागो, सॅनफ्रान्सिस्को लॉस एंजिलिस आणि ह्यूस्टन ही ती पाच शहरे. याप्रमाणेच चीनमध्येही राजधानी बीजिंगव्यतिरिक्त शांघाय, वुहान, शेनयांग, वांग्झाओ आणि चेंगडू या पाच शहरांमध्ये अमेरिकेचे दूतावास आहेत. 1979 साली ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ (पीआरसी) या चीनच्या माओस्थापित राजवटीला मान्यता दिल्यानंतर हे दूतावास स्थापन करण्यात आले. ह्यूस्टन आणि वुहान येथील कार्यालये ही भगिनी दूतावास म्हणून ओळखली जातात. त्यामुळे चीनची ह्यूस्टनमधील वकिलात बंद केल्यावर अमेरिकेची वुहानमधील वकिलात बंद करण्याचा आदेश काढून चीन जशास तसे उत्तर देईल असे वाटत होते परंतु ‘कोविड-19’च्या साथीची सुरुवात झाल्यापासून बंदच असलेल्या वुहान दूतावासाऐवजी दक्षिण चीनच्या मध्यावर असणाऱया चेंगडू शहरातील वकिलातीला कुलूप ठोकण्याचे आदेश चिनी सरकारने दिले. ह्यूस्टनमधील चिनी दूतावास बंद करण्याचे फर्मान ट्रम्प प्रशासनाने काढल्यावर चीनकडून गरमागरम प्रतिक्रिया व्यक्त होणे स्वाभाविक आहे. ‘अतिरेकी आणि असमर्थनीय’ असे या अमेरिकन निर्णयाचे वर्णन करत वँग वेनबिन या परराष्ट्र प्रवक्त्याने चीनची प्रतिक्रिया दिली. परस्पर संबंधांवर घातक परिणाम करणारा हा निर्णय त्वरित मागे घेण्याचे आवाहन करून जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिल़ा या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणाचे निरीक्षक आणि विश्लेषक यांच्यामध्येही उमटणे स्वभाविक आह़े त्यांच्या मते सॅनफ्रान्सिस्को येथील चिनी दूतावास बंद करण्याचा अमेरिकेचा विचार होता, पण चिनी लोकवस्ती त्या प्रांतात जास्त आहे अािण मोठय़ा प्रमाणावर व्हिसा दिले जातात़ त्यामुळे तो दूतावास बंद करण्याचा विचार बाजूला पडल़ा वुहानमध्ये ‘कोविड-19 चा’ प्रादुर्भाव सुरू झाल्यावर चीन सोडण्याच्या प्रयत्नात असणाऱया अमेरिकन कर्मचाऱयांना देशभर नाचवल़े त्रासदायक वागणूक दिली आणि महागडी खाजगी विमाने करण्यास भाग पाडण्यात आले, हे दूतावास बंद करण्यामागचे कारण असू शकते, असे ‘फॉरिन पॉलिसी’ या अमेरिकन माध्यमाला वाटत़े परंतु ट्रम्प प्रशासनाने दिलेले तात्कालिक कारण निराळे आह़े व्हिसा कागदपत्रात घोटाळे केल्याचा आरोप असलेल्या जुआन टँग या चिनी संशोधक महिलेला ह्यूस्टनच्या दूतावासात आश्रय देण्यात आला होता हे ते कारण आह़े ती समान्य विद्यार्थिनी आहे, असा दावा चीनकडून होत असला तरी तिची चिनी लष्करी गणवेशातील छायाचित्रे प्राप्त झाल्याचे अमेरिकेचे म्हणणे आह़े ही महिला चीनच्या वायुदलाच्या वैद्यकीय विद्यापीठात संशोधक असल्याचे उघड झाले आह़े
या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी यापूर्वीच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मांडलेला मुद्दा चीनच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत़ो बँग यांचे म्हणणे असे की अमेरिकेचे चीनबाबतचे धोरण चुकीच्या माहितीवर आधारलेले आह़े त्यामागे भावनेचा रेटा आणि असत्य तेच सत्य असे भासवणाऱया मॅकार्थीवादाचा प्रभाव जास्त आह़े
चिनी विद्यार्थी शिक्षणाच्या बहाण्याने अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊन हेरगिरी करत असल्याची चर्चा अलीकडे सर्वत्र होऊ लागली आह़े परंतु वँग यी म्हणतात, ‘प्रत्येक चिनी विद्यार्थी गुप्तहेर चीनच्या प्रत्येक गुंतवणुकीमागे राजकीय प्रेरणा आणि सहकार्याच्या प्रत्येक पावलागणिक छुपा अजेंडा अशी परिस्थिती आहे का?’ मात्र याच ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या मते ह्यूस्टन येथील दूतावास बंद केल्यावर चीनने प्रतिटोला दिला असला तरी या प्रकारांचा अर्थकारणावर परिणाम होउढ नये आणि आंतरराष्ट्रीय समुदायात चीन एकटा पडू नये याची काळजी अमेरिकेला शह देऊ पाहणारी ती आशियाई नव बलाढय़ सत्ता करत आह़े या सर्व घटनांबाबत चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी कोणतेही भाष्य केले नाही याकडे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने लक्ष वेधले आह़े
नाटय़पूर्ण आणि अनपेक्षित असे या ‘बंद’च्या अमेरिकन आदेशाचे वर्णन करत चीन प्रतिटोला देईल अशा शब्दात बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत आशियाई प्रदेशाची जबाबदारी सांभाळणारे परराष्ट्र खात्याचे उपाध्यक्ष डॅनियल रसेल यांनी केलेले भाकित 72 तासात खरे झाल़े अमेरिकेतीलच काही जाणकारांना या साऱयामागे ट्रम्प यांची निवडणूक तयारी असल्याचे वाटत आह़े कोविड-19 पासून नागरिकांचे संरक्षण करण्यात आलेले अपयश लपवण्याचा त्यांना हा प्रयत्न वाटत़ो दुसरीकडे नव्या शीतयुद्धाचा प्रारंभ होत आहे, अशीही चर्चा सुरू झाली आह़े हे खरोखरच शीतयुद्ध असेल काय त्याचे उत्तर मिळवण्यास फार काळ वाट पहावी लागणार नाह़ी
राजेंद्रप्रसाद मसुरकर, 9960245601