प्रतिनिधी / बांदा:
वाहतूक दरवाढीबाबतचा निर्णय घेण्यासाठी डंपर चालक मालक संघटनेने गौण खनिज व्यावसायिक आणि वाहतूक ठेकेदार यांना सोमवारपर्यंतची (ता.४) डेडलाईन दिली आहे. डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेवून वाहतूक दरवाढ करावी आणि दरवाढ न करता गौणखनिज (खडी) वाहतूक सुरू केल्यास महसूल आणि आरटीओ विभागाला त्या वाहनांवर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. बांदा येथील श्री स्वामी समर्थ हॉल मध्ये ही बैठक झाली.
वाहतूक रुटवरील व जवळपासच्या गाड्या चालावाव्यात. सर्वांना समान ट्रीप मिळाव्यात. सर्वांचा वाहतूक दर समान असावा. दरवाढ होईपर्यंत गौणखनिज वाहतूक बंद ठेवावी.