प्रतिनिधी / शिरोळ
ट्रक चालकाने डंपर चोरून विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांना मिळताच पोलिसांनी शिताफीने धाड टाकून एकास अटक दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त .याबाबत पोलिसांकडन मिळालेली माहिती अशी की 22 मे रोजी शिरोळ शिरटी रोडवर फिर्यादी विनायक अशोक माने रा. मिरज जि.सांगली यांचा वीट भट्टी चा कारखाना आहे या वीटभट्टीवर संशयित आरोपी लकापपा उर्फ मुदकापपा बसाप्पा मादर वय वर्ष 32. सध्या रा हणार शिरोळ.
हा ट्रक ड्रायव्हर म्हणून माने यांच्याकडे कामाला होता कोरोना च्या पार्श्वभूमीवर लोकडाऊन असल्याने काम बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन डंपर चालक मादर याने 22 मे रोजी कोणासही काहीही न सांगता डंपर चोरून नेला होता विनायक माने यांनी. शिरोळ पोलिसात चोरीची फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथक करीत होते गुरुवारी संशयित आरोपी लकापपा उर्फ मुदकापपा बसाप्पा मादर हा डंपर विक्रीचा सौदा करण्यासाठी गोटककंडकी ता मुद्देबिहाल जि गुलबर्गा कर्नाटक येथे येणारा असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे पो. हे. कॉ. डी. डी. सानप पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला व हनुमंत माळी यांनी धाड टाकून आरोपीस ताब्यात घेतले सदर गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातील डंपर किंमत दहा लाख रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली डी डी सानप हे करीत आहेत.