रविवारी 433 पॉझिटिव्ह, 15 जण दगावले, 5 डॉक्टर-वैद्यकीय कर्मचाऱयांनाही बाधा
प्रतिनिधी/ बेळगाव
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करणाऱया डझनभर कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी कोरोनाबाधितांच्या आकडय़ाने चार शतके पार केली असून 433 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 24 तासांत 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांना लागण सुरूच आहे. बिम्समधील 2 व खासगी 3 अशा एकूण पाच डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याच्या कार्यालयातील तिघा जणांसह एकूण पाच वैद्यकीय कर्मचाऱयांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी एकूण बाधितांच्या आकडय़ाने साडेपाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. हलभावी येथील आयटीबीपीच्या आणखी 4 जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बेळगाव तालुक्मयातील 205 जणांचा समावेश
433 पैकी बेळगाव तालुक्मयातील 205 जणांचा समावेश आहे. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी ग्रामीण भागातील 28 तर शहर व उपनगरांतील 173 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांपैकी बेळगाव शहर व परिसरातील बाधित व संशयितांचा समावेश अधिक आहे.
शहर व उपनगरांतील 6 जणांचा मृत्यू
बेळगाव शहर व उपनगरांतील 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर हिरेबागेवाडी, इंचल, सौंदत्ती, अथणी, कुलगोड ता. गोकाक, बैलहोंगल येथील बाधितांचा मृतांमध्ये समावेश आहे. निपाणी येथील दोघे जण दगावले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारचा मृतांचा आकडा 15 हून अधिक आहे.
वंटमुरी परिसरात 10 व टिचर्स कॉलनी खासबाग येथील 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील एसबीआयच्या दोन वेगवेगळय़ा शाखेतील 12 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी ‘तरुण भारत’ने एसबीआयच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
यमनापूर, खणगाव खुर्द, हलगा, अलारवाड, रामतीर्थनगर, अनगोळ, उद्यमबाग, केळकरबाग, अशोकनगर, शेरी गल्ली, शिवबसवनगर, गँगवाडी, शास्त्राrनगर, अंजनेयनगर, वंटमुरी, कंग्राळी बी. के., काकती, कुदेमनी, सदाशिवनगर, शाहूनगर, बसवन कुडची, श्रीनगर, मजगाव, शिवाजीनगर, न्यू वैभवनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
वडगाव, खासबाग, शहापूर, हिंदवाडी, सहय़ाद्रीनगर, बसव कॉलनी, कॅम्प, महाद्वार रोड, पापामळा, विश्वेश्वरय्यानगर, आनंदवाडी शहापूर, अनंतशयन गल्ली, काळी आमराई, माळी गल्ली, कपिलेश्वर कॉलनी, पार्वतीनगर, टिचर्स कॉलनी खासबाग, हिरेबागेवाडी, हिंडलगा, मराठा कॉलनी, महांतेशनगर, कणबर्गी, अनगोळ, भाग्यनगर, कामत गल्ली, माळमारुती परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
ऑक्सिजन बेडची अत्याधिक गरज
बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. ज्यांना लक्षणे दिसून येत नाहीत अशांवर घरीच उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खासकरून श्वसनाचा त्रास असणाऱया रुग्णांचा भरणा वाढला आहे. 20 हून अधिक जणांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर 90 हून अधिक जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. एकंदर परिस्थिती लक्षात घेता ऑक्सिजन बेडची गरज वाढली आहे. सध्या असलेले ऑक्सिजन सिलिंडरची क्षमता वाढविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पाईपलाईनच्या माध्यमातून या इस्पितळात लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.
455 जण कोरोनामुक्त
बेळगाव शहर व जिल्हय़ातील वेगवेगळय़ा कोविड-19 केअर सेंटरमध्ये उपचार घेणारे 455 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. यापैकी लक्षणे नसणाऱया बाधितांची संख्याच अधिक आहे. 433 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर 455 जण कोरोनामुक्त झाले आहेत.