प्रतिनिधी/ सातारा
कोरोना बाधितांचे एका बाजूला आकडे वाढत असताना दुसऱया बाजूला नियमांचे तीन तेरा वाजवत आहे. सातारा वाहतुक शाखेने पुन्हा दुपारपासून कारवाईला प्रारंभ केला आहे. कारवाईमुळे अनेक सातारकरांची चांगलीच तंतरली आहे. तरुण भारतने केलेल्या प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे सातारा पोलीस दलाने ही कारवाई सुरु केली. दुपारपर्यंत 500 वाहनांवर कारवाई करण्यात आली.
शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. नागरिक नियम पाळेना झालेत. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडताना दिसत आहे. रुग्णालयात काम करणारे काही कर्मचारीही नियमांना तिलांजली देताना दिसत आहेत. तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करताच सातारा पोलिस दलाने जिल्हा दखल घेवून शहरात सकाळपासून कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमध्ये वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. डबल शीट आढळून आल्यास त्यांच्यावर ऑनलाईन दंड करण्यात येत होता.