दुबई : सध्या येथे सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयसीसीचे पंच डरेन गॉ यांनी कोरोना संदर्भातील जैविक सुरक्षा नियमाचे उल्लंघन केल्याने ते या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात पंचगिरी करणार नाहीत, असे स्पष्टीकरण आयसीसीच्या प्रवक्त्याने दिले आहे.
कोरोना महामारी समस्येमुळे आयसीसीने गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत जैविक सुरक्षा नियमाची अंमलबजावणी आयसीसीच्या सर्व अधिकाऱयांसाठी सक्तीची केली आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत डरेन गॉ यांच्याकडून या नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने त्यांना या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात पंचगिरी करण्यास मनाई केली आहे.