वृत्तसंस्था/ टेक्सास
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या डल्लास खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या रीली ओपेल्काने एकेरीचे जेतेपद पटकाविताना आपल्याच देशाच्या ब्रुक्सबायचा पराभव केला.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात ओपेल्काने ब्रुक्सबायचा 7-6 (7-5), 7-6 (7-3) असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेतील ओपेल्काचे हे दुसरे अजिंक्यपद आहे. 2019 साली त्याने ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती.