ओटवणे/ प्रतिनिधी-
अखिल भारतीय पोस्टल ग्रामीण डाक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी संतोष हरियाण यांची तर सचिवपदी तुकाराम बाळकृष्ण गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली. ओरोस येथे झालेल्या अखिल भारतीय पोस्टल ग्रामीण डाक संघटनेच्या द्वावार्षिक अधिवेशनात ही निवड करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय पोस्टल ग्रामीण डाक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश रिजनल सचिव दत्ताराम सागवेकर, कोल्हापूरचे ऑर्ग नायजयर सचिव दत्ताजी टीपुगुडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सुमारे ५०० डाक सेवक उपस्थित होते.