5 वर्षांनी टीव्हीवर करणार पुनरागमन
छोटय़ा पडद्यावरून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या चर्चेत आहे. स्वतःच्या बहारदार नृत्याने चाहत्यांची मने जिंकणारी मौनी आता डान्स रिऍलिटी शो ‘डान्स इंडिया डानस लिटि मास्टर सीझन 5’मध्ये परीक्षक म्हणून दिसून येणार आहे. याचबरोबर मौनी 5 वर्षांनी छोटय़ा पडद्यावर पुनरागमन करत आहे.
माझ्यासाठी नृत्य एक अभिव्यक्ती आहे. हा विविध कलांचा एक मिलाप आहे. मी एक परीक्षक म्हणून या शोचा हिस्सा होण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. छोटय़ा मुलांना मोठय़ा व्यासपीठावर स्वतःच्या प्रतिभेचे प्रदर्शन करताना पाहण्यासाठी मी आणखीन प्रतीक्षा करू शकत नसल्याचे ती म्हणाली.
मागील वर्षी मौनीने अनेक ब्लॉकबस्टर म्युझिक व्हिडिओजद्वारे स्वतःच्या नृत्याचे कौशल्य दाखवून दिले होते. तिच्या ‘डिस्को बलमा’, ‘दिल गलती कर बैठा है’ आणि ‘जोडा’ने मोठी प्रसिद्धी मिळविली होती. मौनीने यापूर्वीच अनेक रिऍलिटी डान्स शोंमध्ये भाग घेतला आहे. मौनीने स्वतःच्या अभिनयाची सुरुवात ‘क्योंकि…सास भी कभी बहू थी’ मालिकेद्वारे केली होती. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसून आली.
मौनी लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसून येणार आहे. यापूर्वी तिने गोल्ड आणि मेड इन चायना या चित्रपटांमध्ये काम केले आहे.