नवी दिल्ली
डाबर इंडियाचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत 2.19 टक्क्यांनी वधारुन 504.35 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दैनंदिन वापरात असणाऱया उत्पादनांची निर्मिती करणाऱया कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. यामध्ये मागील आर्थिक वर्षातील तिसऱया तिमाहीत डाबरने 493.50 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. यासोबतच कंपनीचे उत्पन्न हे तिमाहीत 7.8 टक्क्यांनी वधारुन 2,941.75 कोटी रुपयांवर राहिले आहे. एक वर्षाअगोदर हा आकडा 2,728.84 कोटी रुपये होता. डाबर इंडियाचा एकूण खर्च 31 डिसेंबर रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत 7.65 टक्क्यांनी वधारुन 2,388.53 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती आहे.