प्रसिद्ध कोरियन बँड ग्रूप ‘बीटीएस’चे डायनामाइट गाणे
‘म्यूझिकेयर्स आणि ज्युलियन’ चॅरिटी रिलीफ लिलावात बँड ग्रूप ‘बीटीएस’चे गाणे ‘डायनामाइट’चे पेहराव 1.18 कोटी रुपयांमध्ये (1,62,500 डॉलर्स) विकले गेले आहेत. हे पेहराव कोरियाच्या प्रसिद्ध बीटीएस या म्युझिक बँड ग्रूपने ग्रॅमी म्युझियमला दान केले होते. 31 जानेवारी रोजी लिलावल झालेला बीटीएसचे हे पेहराव त्या दिवसात विकली गेलेली सर्वात महागडी वस्तू होती.
लिलावातून प्राप्त रक्कम ‘म्युझिकेयर्स’ फौंडेशनला देण्यात येणार आहे. हे फौंडेशन संगीत व्यावसायिकांना मदत करते. जपानचे कलासंग्राहक युसाकु मेजवा आणि युटय़ूबर हिकाकिन यांनी हे पेहराव खरेदी केले आहेत.
ग्रॅमी पुरस्कारासाठी नामाकंन
ग्लोबल पॉपस्टार बँड ग्रूप ‘बीटीएस’ने हा पेहराव 2020 मध्ये प्रदर्शित स्वतःचे पहिले इंग्रजी गाणे ‘डायनामाइट’मध्ये परिधान केला होता. हा म्युझिक व्हिडिओ जगभरात प्रचंड लोकप्रिय ठरला होता. अमेरिकेत हे गाणे पहिल्या क्रमांकावर राहिले होते. बीटीएस बँड ग्रूपला या गाण्यासाठी ‘ग्रॅमी अवॉर्ड्स 2021’साठी नामांकनही मिळाले आहे. युटय़ूबच्या इतिहासात 24 तासांत सर्वाधिक 10 कोटी प्रेक्षक लाभलेला हा म्युझिक व्हिडिओ ठरला होता.