वृत्तसंस्था / मोनॅको
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक वर्षी विविध देशांमध्ये डायमंड लिग ट्रक फिल्ड ऍथलेटिक्स सिरीज नियमितपणे घेतली जाते. 2021 च्या ऍथलेटिक्स हंगामामध्ये डायमंड लिग सिरीजमधील 14 स्पर्धा 14 विविध शहरांमध्ये आयोजन करण्याची योजना आहे आखली आहे.
डायमंड लिग स्पर्धा आयोजकांनी मंगळवारी 2021 च्या स्पर्धा कार्यक्रमाची घोषणा केली. दरम्यान डायमंड लिग सिरीजला मोनॅकोतील रॅबेट येथे 23 मे पासून प्रारंभ होईल. या सिरीजमधील शेवटची स्पर्धा 8-9 सप्टेंबरला झुरीचमध्ये घेतली जाईल. 13 जुलै रोजी या सिरीजमधील स्पर्धा लंडनमध्ये होणार आहे. या स्पर्धेनंतर डायमंड लिग सिरीजला काही कालावधीसाठी विश्रांती दिली जाणार आहे. कारण टोकिओमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा याच कालावधीत होणार आहे. टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर डायमंड लिग सिरीजच्या दुसऱया टप्प्याला 14 ऑगस्ट रोजी शांघायमध्ये प्रारंभ होईल. 21 ऑगस्ट रोजी उत्तर अमेरिकेतील युजीन, ओरलँडो येथे या लिग स्पर्धेतील टप्पा होणार आहे. 2022 सालातील विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेचे यजमानपद युजीन भूषविणार आहे.