हळूहळू एकीकडे संपूर्ण जग पूर्वपदावर येत आहे, दुसरीकडे भारतीय सिनेसफष्टीही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवनवे चित्रपट घेऊन सज्ज झाली आहे. मागील सात महिन्यांपासून सिनेचाहत्यांना ज्याची प्रतीक्षा होती, ती सिनेमागफहेही महाराष्ट्रात खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे मराठी सिनेसफष्टीसह सिनेप्रेमींमध्येही आनंदाचे वातावरण आहे. आता रसिकांना आपले आवडते कलाकार नव्या रूपात मोठया पडद्यावर भेटणार आहे. लागीर झालं जी या मराठी मालिकेद्वारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला निखिल चव्हाण एका नव्या रूपात आणि नव्या शैलीत आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निखिल सध्या डार्लिंगच्या प्रेमात आहे.
7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेल्या डार्लिंग या आगामी चित्रपटात निखिल एका नव्या रूपात दिसणार आहे. निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. एका महत्त्वपूर्ण सिनेमात निखिलसारख्या हरहुन्नरी कलाकाराला आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळणे हे लक्षवेधी ठरते. निखिलने नेहमीच मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या वाटयाला आलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिला आहे. याच कारणामुळे आज तो घराघरात लोकप्रिय आहे. याचाच फायदा निखिलला डार्लिंग या सिनेमातही होणार यात शंका नाही. याशिवाय यात प्रथमेश परबही मुख्य भूमिकेत असल्याने उत्सुकता वाढली आहे. मराठी सिनेसफष्टीतील आजच्या घडीचे आघाडीचे तीन कलाकार डार्लिंगमध्ये एकत्र आल्याने सिनेमात काहीतरी अचाट पहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. टकाटक या सिनेमाच्या यशानंतर रितिका आणि प्रथमेश ही जोडी पुन्हा डार्लिंगमध्ये एकत्र आल्याने या सिनेमात निखिलची व्यक्तिरेखा कोणत्या प्रकारची असणार याबाबत मराठी सिनेसफष्टीसोबतच सिनेरसिकांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. 7 जानेवारी 2021 ला डार्लिंग संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.