शेजाऱयांच्या भिंतींनाही पाडले भगदाड
कुठल्याही गोष्टीचे व्यसन वाईटच असते. पण अनेक लोकांमध्ये अजब गोष्टी पसंत करण्याची सवय दिसून येते. याचेच उदाहरण आहे अमेरिकेच्या मिशिगनमध्ये राहणारी निकोल. या महिलेला चॉक खाण्याची सवय आहे. हीच सवय पुढे जात व्यसनाच्या स्वरुपात बदलली आहे, यामुळे ती घराची भिंत खाऊ लागली आहे. निकोल आता दिवसातून 6 वेळा स्वतःच्या घराच्या भिंतीतून चुना ओरबाडून खात असते. लोक तिच्या या व्यसनामुळे हैराण झाले आहेत.
कोरडय़ा भिंतीचा गंध मला खूप चांगला वाटतो. तसेच भिंतीची चवही मला पसंत असल्याचे निकोलने म्हटले आहे. एका आठवडय़ात निकोल 3.2 चौरस फूट आकाराची भिंत फस्त करते. एका मुलाची आई असलेली निकोल मनात इच्छा जागृत झाल्यावर भिंत ओरबाडून खाऊ लागते. भले मग ती स्वतःच्या घराची भिंत असो किंवा मित्राच्या घराची. तिने स्वतःच्या नातलगांच्या घरांच्या भिंतींनाही भगदाड पाडले आहे.
भिंतींनाही असते वेगळी चव
चॉक खाण्याची सवय 5 वर्षांपूर्वी व्यसनात बदलली होती. तिचा माझ्या आईचा मृत्यू झाला होता. आईच्या निधनाच्या दुःखात मी भिंत खाऊ लागल्याचे कुणालाच कळले नसल्याचे निकोल सांगते. पण या सवयीमुळे निकोलला खंतही वाटते, कारण ही खाण्याची गोष्ट नसल्याची जाणीव तिला आहे. तरीही ती स्वतःच्या व्यसनापुढे हतबल आहे. विविध प्रकारच्या भिंतींची चव चाखणे मला पसंत आहे. काही भिंती जाड असतात, तर काही कमी जाड असतात आणि त्यावर रंग चढविण्यात आला असतो, या सर्वांची चव वेगळी असते असे निकोलने म्हटले आहे.
डॉक्टरांचा इशारा या व्यसनाचा खुलासा केल्यावर डॉक्टरांनी निकोलला इशारा दिला आहे. भिंतीच्या रंगात असलेल्या रसायनांमुळे कर्करोगासारखा आजार होऊ शकतो. यामुळे तिच्या इंटेस्टाइनमध्ये मोठी समस्या निर्माण होऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. पण निकोल स्वतःला हतबल मानते. तिने अनेकदा स्वतःला या व्यसनापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळू शकलेले नाही. तिच्या घराच्या भिंती अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त झाल्या आहेत.