प. बंगालकरता निर्णय
कोलकाता : पुढील वर्षी होणाऱया पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकरता काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी यासंबंधी घोषणा केली आहे. काँग्रेस पक्षशेष्ठींनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीकरता डाव्या पक्षांसोबत आघाडी करण्यास औपचारिक मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.
राज्यात ममता बॅनर्जी आणि भाजप या दोघांनाही रोखण्यासाठी डावे पक्ष तसेच काँग्रेसमध्ये आघाडी होणे गरजेचे असल्याचे चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. राज्यातील सत्तारुढ तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या स्थितीत डावे तसेच काँग्रेस या पक्षांना स्वतःचा प्रभाव वाढवावा लागणार आहे.