सावंतवाडी / प्रतिनिधी-
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील यांना शासनाने मे २०२२ पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्याबद्दलचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. डॉक्टर पाटील हे आज ३१ मे २०२१ रोजी सेवा निवृत्त होणार होते. कोरोना संसर्ग काळात त्यांनी चांगले काम केले त्यामुळे त्यांना शासनाकडून वैद्यकीय अधीक्षक पदाची एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.