डिचोली/प्रतिनिधी
गावकरवाडा डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरातून साजरी करण्यात येणारी डिचोलीची वैशिष्टय़पूर्ण घोडेमोडणी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. कोवीड संसंर्गाचा धोका असला तरी भाविकांचा उत्साह मोठा होता. मोठय़ा संख्येने लोकांनी या उत्सवात उपस्थिती लावली होती. बहुतेकजणांनी मास्कचा घालतच मिरवणुकीत नाचण्याचा आनंद लुटला.
गावकरवाडा येथील श्री देवी शांतादुर्गेचा चार घोडय़ांच रथ म्हणजेच घोडेमोडणी. या घोडेमोडणीत चार घोडे असतात. पैकी तर न गावकर वांगडी आणि एक परब वांगडी यांचा. घोडेमोडणी दिवशी सदर चारही घोडे आपल्या कुळाकडे नेसल्यानंतर कुळपुरूषाला नमन करून ते देवी शांतादुर्गेच्या मंदिरत दाखल झाले. मंदिराला पाच प्रदक्षिणा मारल्यानंतर त्यांची मंडपात पुरोहितामार्फत विधीवतपणे पूजा करण्यात आली. चार वांगडय़ांपैकी एक गावकर वांगडी गावकराकडून गाराणे घालण्यात आले. त्यानंतर सर्व घोडय़ांच्या अंगात दैवी संचार आल्यागत ते मंदिराच्या मंडपातून रस्त्यापर्यंत धावत आले. तेथून ढोल ताशांच्या गजरात पावली नृत्य करत ते आतीलपेठ येथील महादेव मंदिराजवळ अल्प काळ विश्रांती घेतली. तेथून आतीलपेठ येथील मठमंदिरासमोर घोडे दाखल झाले. कायरो इस्पितळ ते मठमंदिर यापर्यंत पाच फेरे मारल्यानंतर ते गावकरवाडा येथे दाखल झाले.
महादेव लक्ष्मीनारायण मंदिराकडून रवळनाथ मंदिरापर्यंत घोडय़ांनी पाच फेरे मारल्यानंतर ते रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात दाखल होतात. मंदिराच्या प्रांगणात पाच फेरे मारल्यानंतर या उत्सवाची सांगता झाली.