रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटय़ाकडून कृत्य. सुमारे 25 हजारांचा ऐवज लंपास. आयुर्वेदिक क्लिनिकमध्येही चोरी.
डिचोली / प्रतिनिधी
डिचोली शहरातील दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेत अज्ञात चोरटय़ांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती जास्त काही लागू शकले नसले तरी सदर पतसंस्थेतील सिसीटिव्हीचे दोन डिव्हीआर चोरटय़ांनी लंपास केले. त्यामुळे सदर चोर कोण ते शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. डिचोली पोलिसांनी तपासकार्याला गती दिली आहे.
सदर चोरीचा प्रकार मंगळ. दि. 3 रोजी संध्या. 6 ते बुव. दि. 4 ऑक्टो. रोजी सकाळी 8.30 या वेळेत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डिचोली शाखा व्यवस्थापक रामचंद्र गावकर यांनी डिचोली पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.
दिनदयाळ भवन इमारतीत तळमजल्यावर असलेल्या दिनदयाळ पतसंस्थेच्या शाखेत पहिल्या मजल्यावरील लोखंडी ग्रील्स तोडून आत प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर सदर पतसंस्थेचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयात चोरांना काही हाती लागले नाही. तर खालच्या मजल्यावर शाखा कार्यालय आहे. या शाखेतील केश काऊंटरवर चोरटय़ाच्या हाती सुमारे साडेसात हजारांची रक्कम लागली. त्याचप्रमाणे या शाखेतील सिसीटिव्ही केमेरांचा डेटा सेव्ह होणारे दोन डिव्हीआर चोरटय़ांनी लांबविले.
या पतसंस्थेच्या शाखेच्या वर असलेल्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्येही सदर चोरटय़ांनी प्रवेश केला आणि त्यातील सुमारे अडीच हजारांची रक्कम लंपास केली. याव्यतिरिक्त चोरांच्या हाती काहीच लागले नाही. दिनदयाळ पतसंस्थेतील तिजोरी फोडण्याचा मोठा प्रयत्न त्या चोरटय़ांनी केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे मोठी रक्कम चोरीला जाण्यापासून वाचली.
सकाळी शाखा उघडण्यात आल्यानंतर हा चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर डिचोली पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनिषा पेडणेकर व इतर पोलीस कर्मचाऱयांनी दिनदयाळ पतसंस्थेत धाव घेतली. व संपूर्ण प्रकारणाची पाहणी केली. तसेच श्वानपथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले.
या प्रकरणात चोरटय़ांनी चालाखी दाखविताना शाखेतील डिव्हीआरच लंपास केल्याने सदर चोरांचा चेहरा टिपणे शक्मय झालेले नाही. त्यामुळे सध्या पोलिसांसमोर चोरटय़ाचा शोध घेण्याचे मोठे आवाहन उभे राहिले आहे. डिचोली पोलीस निरिक्षक महेश गडेकर यांनी या प्रकरणाच्या तपासाला लगेच गती दिली आहे. विविध पथके तयार करून विविध ठिकाणी पाठविले आहे. तसेच इतरही काही धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.