मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. डिचोली नगरपालिकेतर्फे बायपास रस्त्याचे सुशोभिकरण. सौंदर्यीकरणात भर
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली शहरातील महत्वपूर्ण बायपास रस्त्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कदंब बसस्थानक यापर्यंत डिचोली नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या सौंदर्यीकरणाचे आज बुध. दि. 10 फेब्रु. रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. डिचोली नगरपालिकेतर्फे सुमारे 1 कोटी रूपये खर्च?न सदर बायपासचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या प्रकलपामुळे डिचोलीच्या सौंदर्यात अधिक भर पडला आहे.
माजी आमदार पांडुरंग राऊत यांच्या दूरदृष्टीतून डिचोली शहराला बगल देणारा हा महत्वपूर्ण असा बायपास रस्ता साकारण्यात आला होता. डिचोली शहरातून पूर्वी सर्वच प्रकारच्या वाहनांची रेलचेल होत होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर सदैव वाहतूक कोंडी होत होती. त्यावर उटाय म्हणून माजी आमदार पांडुरंग राऊत यांनी या बायपास रस्त्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तो साकारही झाला. या बायपासला त्याकाळी अनेकांनी विरोधही केला होता. मात्र सदर विरोधाला न जुमानता ह बायपास रस्ता साकारल्याने आज डिचोली शहर वाहतुकीच्या बाबतीत मोकळा श्वास घेत आहे.
ह बायपास साकारल्यानंतर त्याच्या पुढील विकासाकडे कोणाचेच लक्ष गेले नव्हते. 2012 पूर्वी खाणी पूर्ण क्षमतेने सुरू असताना डिचोलीत कार्यरत असलेल्या सेसा खाण कंपनीकडून या बायपासच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र 2012 साली खाणी बंथ पडल्यानंतर सेसा कंपनीने या बायपासचे काम अर्ध्यावरच सोडून दिले. या संदर्भात नगरपालिकेने विचारले असता खाणी बंद असल्यामुळे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते.
त्यानंतर डिचोली नगरालिकेचे माजी नगराध्यक्ष सतीश गावकर यांच्या नेतृत्वाखाली या भागाच्या स्थानिक नगरसेविका चैतन्या कमलेश तेली यांनी सदर बायपासचे अर्ध्यावर पडलेले काम पूर्ण करून त्याचे योग्य सौंदर्यीकरण करण्यात यावे. असा प्रस्ताव मांडला होता. सदर प्रस्तावाला डिचोली नगरपालिकेने मान्यता देत सरकारकडून त्याच्या सौंदर्यीकरणासाठी 1 कोटी रूपयांचा निधी मंजूर करूं आणला आणि त्या कामाला प्रारंभ करण्यात आला. सभापती राजेश पाटणेकर यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती.
चौपदरी रस्ता, फुटपाथ आणि रस्ता दुभाजक
हा बायपास रस्ता हा चौपदरी होता. मात्र त्याचा योग्य विकास नंतरच्या काळात न झाल्याकारणाने त्याला ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच त्याच्या दोन्ही बाजूला अवजड वाहनांसाठी पार्किंग अधिसूचित असल्याने दोन्ही बाजूला अवजड वाहने, मशिन, पेन यासारखी वाहने सर्रासपणे पार्क करून ठेवली असायची. या वाहनांमुळे अनेकदा अपघातही घडले होते. आत डिचोली नगरपालिकेने य बायपासला मधोमध दुभाजक साकारून त्यात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच दोन्ही बाजूला लांबच्या लांब फुटपाथ साकारण्यात आली आहे. त्यामुळे पादचाऱयांना वाहनांचा धोका निर्माण होणार नाही.
अवजड पार्किंग अधिसूचना रद्द
या बायपास रस्त्याचा विकास साधताना या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अधिसूचित असलेल्या अवजड वाहन पार्कींगचा मुद्दा समोर येत होता. सदर पार्किंग हि रितसर अधिसूचित असल्याने सदर वाहने य बायपासवरून हटविणे शक्मय नव्हते. त्यासाठी माजी नगराध्यक्ष सतीश गावकर यांनी सदर पार्किंग अधिसूचना रद्द करण्यासाठी सरकारदरबारी अर्ज केला होता. त्याचा सतत व प्रभावीपणे पाठपुरावा करताना त्यांनी सदर अधिसूचना संबंधित अधिकारणीकडून रद्द करण्यात यश मिळविले. त्यामुळे आता सदर बायपास रस्त्यावरील अवजड वाहनांच्या पार्किंगच्या समस्येपासून इतर वाहनांना आणि पादचाऱयांनाही सुटका मिळाली आहे.
डिचोली शहराच्या सौंदर्यात भर पडणार – सतीश गावकर
डिचोली शहरात डिचोली नगरपालिकेतर्फे अनेक विकास प्रकल्प हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. डिचोली शहरात प्रवेश केल्यानंतर बाहेरील वाहनचालकांचे स्वागत आता हा सुशोभित आणि सौंदर्याने नटलेला बायपास रस्ता करणार आहे. या बायपास रस्त्यामुळे डिचोलीच्या सौंदर्यात भर पडणार आहे. डिचोलीवासीयांनी गेल्या पाच वर्षांत दिलेल्या संधीचा लाभ उठविताना केलेल्या विकासाचे फळ डिचोलीवासीय या पालिका मंडळाला याही वेळी देणार, यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष सतीश गावकर यांनी व्यक्त केली.
परिसराला नवीन साज प्राप्त झाला – कमलेश तेली
गेल्या दोन वर्षांपूर्वी शांतादुर्गा हायस्कुलसमोरील सर्कलमध्ये छत्रपती शिवाजी महारांजांचा अश्वारूढ पुतळा आणि आता या बायपास रस्त्याचे सुशोभिकरण यामुळे या परिसराला नवीन झळाळी प्राप्त झालेली आहे. तसेच सर्कलभोवती वाहतूक सिग्नल्स आल्याने या परिसरातील वाहतुकीची समस्या निकालात निघाली आहे. आता या सर्कलच्या सभोवतालीचा रस्ता रंद करून वळणाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. त्याचाही प्रस्ताव सरकारदरबारी असून लवकरच सदर काम होणार असल्याचे या भागाचे माजी नगरसेवक कमलेश तेली यांनी सांगितले.