डिचोली/प्रतिनिधी
बोर्डे डिचोली येथील स्वरबहार संगीत मंडळातर्फे संगिततज्ञ स्व. कृष्णा माशेलकर स्मृति संगीत संमेलन डिचोली सार्वजनिक गणेश मंडळ सभागृहात शनिवार दि.11 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
कला व संस्कृती खाते, कला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद गोवा शाखा यांच्या विद्यमाने आयोजित संमेलनाचे उदघाटन सायंकाळी 6 वा. सभापती राजेश पाटणेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी, संचालक सुदर्शन आदी उपस्थित असतील. अशी माहिती स्वर बहार मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र पळ यां?नी दिली. यावेळी सीताराम पळ, रामकृष्णबुवा गर्दे, पांडुरंग साळकर, मदन माशेलकर यांची उपस्थिती होती.
वेदांग गावस यांच्या भक्तीगीताने संमेलनाला आरंभ होणार असून डॉ दत्तात्रय वेलणकर यांचे शास्त्रीय गायन, रामदास पळ सुळे यांचे तबला सोलो वादन, सम्राज्ञी शेलार यांचा नाटय़गीतांचा कार्यक्रम बाबुराव माशेलकर यांचे संवादिनी सोलो वादन होणार आहे. या संमेलनासाठी सिताराम पळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती निवडण्यात आली आहे. त्यात ममता गावकर, दीपक लिंगुडकर, नारायण गोवेकर, संदीप सिनारी, विठ्ठल शिरोडकर, महेंद्र परब, विष्णू वळवईकर, रोहिदास गाड, रमाकांत मातोंणकर, फटी बायकर, मीना वाडीकर, नामदेव वालावलकर, आनंद शिरोडकर, प्रेमप्रकाश नाईक, सुनील च्यारी, सुशांत परब, पुष्पा परवार, वंदू नाईक, दत्ता घाडी, आनंद नाईक, विनायक पळ, संजीव आजगावकर, देवानंद भोसले, संदेश मान्द?कर, हरी नाईक यांचा समावेश आहे.