कव्वाली गायनाचा लोकांनी घेतला आस्वाद. आदल्या दिवशी शहरात भव्य मिरवणूक.
डिचोली/प्रतिनिधी
मुस्लिमवाडा डिचोली येथील हजरत अदुलशाह बाबा रहेम्मतुल्हाह आलैय दर्ग्याजवळ दर्गा समितीतर्फे वार्षिक उरूस शरीफ सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी रात्री डिचोलीतील लोकांना कव्वाली गायनाचा आस्वाद घेण्याची संधी लाभली.
या निमित्त शुक्रवारी संध्याकाळी दर्ग्यावरून संदल मिरवणूक काढण्यात आली. डिचोली शहरात फिरल्यानंतर हि मिरवणूक मुस्लीमवाडा येथे दर्ग्यावर दाखल झाल्यानंतर संदल चढविण्यात आली. त्यानंतर सामुहीक भोजनाचा कार्यक्रम झाला.शनि. दि. 26 रोजी रात्री दर्ग्याजवळ विशेष उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कव्वाल नजीर अली साबरी (नवी दिल्ली) व कव्वाला रूबी ताज (नागपूर) यांच्यात कव्वालीचा मुकाबला रंगला. या कव्वालीला मोठय़ा संख्येने डिचोली व परिसरातील लोकांची उपस्थिती होती.