पक्षाकडे आपला होकार सादर. यावेळी हि उमेदवारी माझीच होती. पक्षाकडून मात्र उमेदवार आय त करण्यासाठी प्रयत्न सुरूच.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली मतदारसंघात सभापती राजेश पाटणेकर यांनी ऐनवेळी निवडणूक लढविण्यास असमर्थता दाखविल्यानंतर डिचोलीची भाजप उमेदवारीवरून निर्माण झालेला घोळ आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. कारण भाजपच्या जे÷ महिला कार्यकर्त्या तथा प्रदेश महिला सरचिटणीस शिल्पा नाईक यांनी हि उमेदवारी स्विकारण्याचे सकारात्मक उत्तर पक्षाला कळविले आहे. तरी प्राप्त माहितीनुसार पक्षाकडून अजूनही उमेदवार आयात करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहे.
डिचोलीत भाजपतर्फे सभापती राजेश पाटणेकर वा शिल्पा नाईक या दोघांचीच नावे उमेदवारीसाठी पुढे गेली होती. परंतु ऐनवेळी सभापती राजेश पाटणेकर यांनी कोवीड बाधा झाल्यानंतर निवडणूक लढविण्यास अनुत्सुकता दर्शविल्याने या मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण या चर्चेला उधाण आले. त्यातच भाजपच्या जे÷ नेत्यांकडून डिचोलीत सक्रिय असलेल्या मगोचे उमेदवार नरेश सावळ व अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांना भाजपमध्ये ओढून उमेदवारी देण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. परंतु दोन्ही नेत्यांनी भाजपची सदर ऑफर नाकारल्यानंतर हि उमेदवारी शिल्पा नाईक यांच्या बरोबरच नवीन चेहरा म्हणून नगराध्यक्ष कुंदन फळारी यांचेही नाव.समोर येऊ लागले.
यावर शिल्पा नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण गेली अनेक वर्षे या मतदारसंघात तसेच पक्षाच्या माध्यमातून राज्यपातळीवर काम करीत आहे. डिचोली मतदारसंघात अनेक वर्षे आपले सक्रियपणे काम सुरूच आहे. या निवडणुकीत पक्षाची उमेदवारीवर आपलाच हक्क होता. परंतु त्यावर काही प्रमाणात अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र आता सभापती राजेश पाटणेकर यांनी माघार घेतल्याने हि उमेदवारी आपल्यालाच मिळणार आहे. आपलीही ती स्विकारण्याची पूर्ण तयारी असून पक्षाला आपण सकारात्मक निरोप कळविला आहे. त्यामुळे आता पक्ष निर्णय घेणार आहे. असे सांगितले.
डिचोली मतदारसंघात आपणास उमेदवारी मिळावी हि अनेकांची इच्छा होती. व तशी मागणीही आपल्या मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांनी पक्षाकडे केली होती. आता त्या मागणीला अधिक वजन प्राप्त झाले असून आपण भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्यास सज्ज आहे, असेही नाईक यांनी पुढे सांगितले. उपलब्ध माहितीनुसार डिचोली मतदारसंघासाठी भाजप पक्षाकडून वेगळी खेळी खेळण्याचा इरादा कायम असून अजूनही वेगवेगळय़ा माध्यमांतून नरेश सावर किंवा डॉ. चंद्रकांत शेटय़? यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. परंतु या दोन्ही नेत्यांनी आपला नकार कायम ठेवल्याने अखेर भाजपला डिचोलीत शिल्पा नाईक यांनाच उमेदवारी द्यावी लागणार हे निश्चित करण्यात आहे. दुसऱया बाजूने या सर्वांवर पर्याय म्हणून डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांचे नाव पुढे येत असून त्यांना उमेदवारी द्यावी म्हणून मागणी करणारेही कार्यकर्ते मोठय़ा संख्येने डिचोलीत आहेत.