व्यापारी आणि लोकांचा 100 टक्के प्रतिसाद. डिचोली पोलिसांकडूनही कडक कारवाई. डिचोली नगरपालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या कमी होण्याची अपेक्षा. 5 दिवशीय लॉकडाऊन रविवारी संपुष्टात.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली नगरपालिकेने 5 मे ते 9 मे असे पाच दिवस पूर्णपणे लागू केलेल्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सध्या उत्कृ÷पणे सुरू असून डिचोली व बाहेरील सर्व व्यापारी आणि विशेषतः नागरीकांनीही 100 टक्के या लॉकडाऊनला प्रतिसाद दिला आहे. मागील तीन दिवस हा लॉकडाऊन कडकपणे पाळण्यात आला असून उर्वरित दोन दोन दिवसही लॉकडाऊनची प्रक्रिया अशीच ठेवण्यात येणार.आहे.
डिचोली नगरपालिका क्षेत्रात कोवीड सकारात्मक रूग्चा?ची संख्या वाढतच राहिल्याने डिचोली नगरपालिका क्षेत्रात नगरपालिकेने सभापती, व्यापारी संघटनेच्या सहकार्याने पाच दिवशीय कडक व संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे केवळ औषधालये, पेट्रोल पंप आणि राष्ट्रीयीकृत बँका वगळता इतर सर्व दुकाने डंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिवनावश्यक सामानांची, भाजी, फळ विक्री दुकानेही पाच दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याची सुचना देण्यात आली होती. या सुचनेला मान देत नगरपालिका क्षेत्रातील सर्वांनी आपापली दुकाने बंद ठेऊन या लॉकडाऊनमध्ये आपला सहभाग दाखविला.
5 मे पासून सुरू झालेल्या या लॉकडाऊनमध्ये सर्व व्यापाऱयांनी 100 टक्के सहभागी होताना एकही दुकान उघडले गेले नाही. केवळ सकाळच्या वेळी काही वेळासाठी वृत्तपत्र विपेते आणि दुध विपेत्यांकडून विक्री केली जाते. आणि त्यानंतर शहरातील आणि बाजारातील सर्व व्यवहार बंदच ठेवले जात आहेत. डिचोली शहरात असलेल्या विविध सहकारी पतसंस्था?नीही आपल्या शाखा बंद ठेऊन या लॉकडाऊनमध्ये सहभाग घेतला आहे. केवळ बँक दर्जा असलेल्या स्थानिक बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकाच खुल्या आहेत. तर शहरातील औषधालये, डॉक्टरांचे दवखाने या सेवा सुरू आहेत.
लॉकडाऊनचा फायदा डिचोलीतील रूग्ण कमी करण्यात व्हावा हि अपेक्षा
कोरोनाची साखळी तुटावी आणि डिचोली नगरपालिका क्षेत्रातील लोक सुरक्षित व्हावे यासाठी डिचोली नगरपालिकेने जाहिर केलेल्या या लॉकडाऊनला डिचोलीतील लोकांनी आणि व्यापाऱयांनी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. या लॉकडाऊनचा चांगला परिणाम येण्याची आता अपेक्षा आहे. सध्या लोकांचे एकमेकांमध्ये मिसळणेच बंद झाल्याने व्हायरसचा संसंर्ग जास्त प्रमाणात पसरण्याची शक्मयता कमीच आहे. तरीही लोकांनी विनाकारण घराबाहेर न पडता राज्य सरकारने रविवारपासून लागू केलेल्या जनता कर्फ्य?मध्ये सहभागी व्हावे. आज प्रत्येकाच्या आरोग्याची सुरक्षितता हेच प्राधान्य बनले असल्याने सर्वांनी आपल्याबरोबरच इतरांच्याही काळजीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी केले आहे.
रविवारी आढावा व पुढील कृती ठरविण्यासाठी बैठक
डिचोली नगरपालिकेने लागू केलेल्या या पाच दिवशीय कडक लॉकडाऊननंतर पुढील कृती ठरविण्यासाठी रविवारी (दि. 9 मे) नगरपालिकेत महत्वाची आढावा बैठक ठेवली आहे. या बेठकीत या लॉकडाऊनचा आढावा घेऊन पुढील आराखडय़ावर चर्चा करण्यात येणार आहे. रविवारी हा लॉकडाऊन संपल्यानंतर सकाळच्या मर्यादित वेळेसाठी केवळ जिवनावश्यक सामानांची दुकाने खुली करून लोकांना सर्व नियम पाळून खरेदीसाठी सुट देण्याचा निर्णय होणार.होता. मात्र राज्य सरकारने रविवारपासून राज्यात कडक कर्फ्य? लागू केल्याने नगरपालिकेला वेगळा निर्णय घेण्याची गरज पडणार नाही. तर सरकारने जाहिर केलेल्या दुकाने खुली ठेवण्याच्या वेळात डिचोली नगरपालिकेतर्फे किंचित फेरफार होण्याची शक्मयता आहे.