सांखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात लाशिकरणास चांगला प्रतिसाद : आज सकाळी मुख्यमंत्री घेतला दुसरा डोस
सांखळी /प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील डिचोली, मये आणि सांखळी मतदारसंघात आज गुरुवारी 44कोरोना रूग्ण सापडले सांखळी मतदारसंघात कोरोनाबाधित 02रूग्ण सापडले आहेत डिचोली मतदारसंघात 33रूग्ण सापडले मये मतदारसंघात 09रूग्ण सापडले डिचोली मतदारसंघात गुरुवारी 44 कोरोना बाधित रूग्ण सापडले तर 487 रुग्ण सक्रिय आहे त्यातील 483रूग्ण घरीच उपचार घेत आहेत 04रूग्ण कॉविठ हॉस्पिटलमध्ये तर सरकारी आरोग्य केंद्रात एकही रुग्ण उपचार घेत नाहीत
सांखळी 197 डिचोली 188आणि मयेत 102कोरोना रूग्ण सक्रिय आहेत अशी माहिती डिचोली मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिलीआहे
डिचोली उपजिल्हाधिकारी दिपक वायगणकर यांच्या मार्गदर्शन खाली गावा गावात, पंचायत कार्यालयात जागृत मोहीम लोक प्रतिनिधी ना सतर्क राहण्याचा सल्ला
सांखळी मतदारसंघातिल शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सांखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस देण्याचे काम नेटाने सुरू असून नागरिकांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे यात जे÷ नागरिकांचा जास्त प्रमाणात समावेश पाहायला मिळत आहे आज गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी कोरोना ची दूसरी लस ठोचून घेतली तसेच सांखळी मतदारसंघात सर्व गावात ,आणि शहरात टीका उत्सव साजरा करण्यात आला आरोग्य अधिकारी उत्तम देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला
सरकारी अधिकारी लोकांची जास्त काळजी घेतात
डिचोली तालुक्मयातील आजकाल कोरोना पेक्षाही सरकारी अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांची जास्त भीती वाटत असल्याचे नागरिकांच्या हालचाली वरून स्पष्ट जाणवत आहे स्वतः चे आणि दुसऱयाच कोरोना पासुन रक्षण करण्यासाठी सरकार मास्क, सॅनिटाईजर, वापरा, सामाजिक दुरी ठेवा असे सरकारने सांगितले असले तरी काही लोक सरकारी अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना पाहूनच वरील गोष्टी अमलात आणताना दिसतात यामुळे जिवा पेक्षा पोलिस कारवाई दंड वसूली याची भीती नागरिकांना वाटत असल्याचे समजते काही असो पोलिसांच्या भीती पोटी तरी काही लोक नियमांचे पालन करतात असे जागृत नागरिकांचे म्हणणे आहे