मामलेदार कार्यालय सेनिटाईझ. डिचोलीतालुक्मयातनवीन 28 रूग्ण
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयात कोरोना सकारात्मक रूग्णांची संख्या सध्या वाढतच असून आता बहुतेक ग्रामीण भागांमध्येही कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. तसेच सरकारी कार्यालयांमध्येही कोरोनाचे रूग्ण आढळू लागले आहेत. डिचोली तालुक्मयातील दोन पंचायत तलाठींना कोरोनाची लागण झाली असून त्या दृष्टीकोनातून डिचोली मामलेदार कार्यालय सेनिटाईझ करण्यात आले आहे. सध्या डिचोली तालुक्मयातील वाढलेल्या रूग्णांच्या आकडय़ात मये मतदारसंघात काल मंगळ. दि. 11 ऑगस्ट रोजी सर्वाधिक 21 कोरोना सकारात्मक रूग्ण आढळून आले आहे. तर साखळ मतदारसंघात नवीन 7 रूग्णांची भर पडली आहे. डिचोली मतदारसंघात ल दोन रूग्ण कोरोना मुक्त झाले असून नवीन रूग्ण आढळून आलेले नाहीत.
डिचोली शहरात कार्यरत असलेल्या सरकारी कार्यालयांमध्ये यापूर्वीही कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. एका शिक्षण संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयातही यापूर्वी कोरोनाचा रूग्ण आढळून आला होता. आता डिचोली तालुक्मयातील दोन पंचायत तलाठय़ांनाच कोरोनाची लागण झाली असल्याने सर्वप्रथम डिचोली मामलेदार कार्यालय सेनिटाईझ करून कार्यालयातील कर्मचाऱयांची स्वेब टेस्ट घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मये मतदारसंघातील एका व साखळी मतदारसंघातील एका अशा दोन पंचायतींच्या तलाठय़ांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे अहवाल सकारात्मक आल्याने आता ते काम करणाऱया संबंधित पंचायत कार्यालयात त्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचारी व लोकांची स्वेब चाचणी घेतली जाणार आहे. तसेच पंचायत कार्यालय आणि तलाठीची खोली सेनिटाईझ करण्यात येणार आहे. असे सांगण्यात आले.
मये मतदारसंघात सर्वाधिक रूग्ण आढळले
काल मंगळ. दि. 11 रोजी मये मतदारसंघात सर्वाधिक 21 कोरोना सकारात्मक रूग्ण आढळून आले आहे. सोम. दि. 10 रोजी मयेतील रूग्णसंख्या 39 होती. ती मंगळ. दि. 11 रोजी थेट 60 वर पोहोचली आहे. मयेतील भावकई, जांभूळभाट, हातुर्ली, वरपाल तसेच पिळगाव, चोडण या भागांमध्ये कोरोना रूग्ण आढळून आलेले आहेत.
साखळी मतदारसंघात सर्वाधिक 86 रूग्ण सक्रिय.
साखळी मतदारसंघात दिवसेंदिवस नवनवीन कोरोना रूग्ण आढळतच असून साखळी सामाजिक आरोग्य केंद्रावर या कामांचा बराच थाण पडला आहे. तरीही आरोग्याधिकारी डॉ. उत्तम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पथक तसेच कर्मचारी वर्ग सेवा बजावत आहे. साखळी मतदारसंघातील जवळपास सर्वच पंचायतींमध्ये व नगरपालिका क्षेत्रात कोरोना रूग्ण सापडलेले आहेत. मंगळ. दि. 11 ऑगस्ट रोजी साखळी मतदारसंघातील विविध भागांमधून 7 नवीन कोरोना रूग्ण आढळून आले. या मतदारसंघातील एकूण सक्रिय रूग्णसंख्या सध्या 86 इतकी आहे.
डिचोलीत दोन रूग्ण कोरोनामुक्त. नवीन रूग्ण नाहीत
डिचोली मतदारसंघात सक्रिय रूग्णांपैकी 2 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने य मतदारसंघातील रूग्णसंख्या 26 झाली आहे. तर मंगळवारी एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड पथक कार्यरत असून लोकांमध्ये योग्य जागृती व मार्गदर्शन केले जात आहे.