डिचोली, साखळी बाजारपेठातील दुकाने बंद. जिवनावश्यक वस्तु?ची दुकानेच चालू. इतर दुकाने पोलीस व सरकारी यंत्रणेनी केली बंद. डिचोली पोलिसांची परिस्थितीवर करडी नजर.
डिचोली/प्रतिनिधी
राज्य सरकारने कोरोनाचा वेगवानपणे चालू असलेला संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या तीन दिवशीय लॉकडाऊनला डिचोली तालुक्मयातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. डिचोली व साखळी बाजारातील जिवनावश्यक सामानाची दुकाने वगळता चालू करण्यात आलेली इतर दुकाने डिचोली नगरपालिका आणि पोलिसांनी बंद पाडली. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातीलही लोकांनी लॉकडाऊन चांगल्या पध्दतीने पाळला.
राज्य सरकारच्या घोषणेनंतर बुधवारी डिचोली व साखळी बाजारात लोकांची सामान खरेदीसाठी झुंबड दिसून आली होती. जिवनावश्यक वस्तु?ची दुकाने चालूच राहणार असे जाहीर करूनही लोकांनी बाजारात किराणा सामान व भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती. तसेच गुरुवारी सकाळीही बाजारातील किराणा दुकानांवर लोकांची गर्दीच होती.
लॉकडाऊनची अंमलबजावणी गुरू. दि. 29 एप्रिल रोजी रात्रीपासून सुरू झाली. गुरुवारी रात्री 9 वा. पूर्वीच डिचोली बाजारातील व्यापाऱयांनी आपापली दुकाने बंद केली होती. केवळ औषधालयेच सुरू होती. तसेच रात्री रस्त्यांवरील लोकांची आणि वाहनांचीही वर्दळ बरीच कमतरता झाली होती. त्यामुळे सर्व शहर व रस्ते सामसूम दिसून येत होते.
काल शुक्र. दि. 30 एप्रिल रोजी सकाळी डिचोली व साखळी बाजरात व शहरात केवळ दुध व वृत्तपत्र विपेत्यांनी आपली दुकाने ठराविक वेळेसाठी खुली केली होती. त्यानंतर बाजारातील किराणा सामानाची दुकाने, औषधालये, भाजी, फळ विपेत्यांनी आपली दुकाने उघडली होती. त्यातच काही बिगरगोमंतकीय व्यापाऱयांनी मिठाई व इतर सामानांची दुकानेही खोलली होती. ती नंतर पोलीस आणि नगरपालिकेच्या अधिकाऱयांनी बंद पाडली.
साखळी बाजार.आणि शहरातील केवळ किराणा सामान, औषधालये, हॉटेल्स, भाजी फळ विपेते चालू होते. साखळी बाजारातही लोकांनी स्वतः या लॉकडाऊनमध्ये सहभागी होत सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प केले.
डिचोली व साखळी या शहरी भागाबरोबरच तालुक्मयातील ग्रामीण भागातील लोकांनीही गांभिर्याने ह लॉकडाऊन पाळला. ग्रामीण भागात तसा इतर सामानाच्या दुकानांचा प्रश्न नाही. मात्र किराणा सामानाची दुकाने व हॉटेल्स चालू होती. मात्र लोकांची जास्त प्रमाणात वर्दळ नव्हती. लोकांनी घरीच राहणे पसंत केले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच रस्ते सामसूम दिसत होते.
सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कदंब महामंडळाच्या बसेस डिचोली तालुक्मयातील विविध रूटवर फेऱया मारत होत्या. खासगी बसेस पूर्णपणे बंदच होत्या. प्रवासी नसल्याने कदंब बसेस खालीच चालत होत्या. या लॉकडाऊनला लोकांनी स्वतः गंभीर घेत तो पाळण्यास सुरूवात केली आहे. दररोज राज्यात सापडणाऱया सकारात्मक रूग्णांचा आकडा तसेच मृतांचा आकडा पाहता आता लोकांनीही धसका घेतला आहे. लोकही आता स्वतःची काळजी घेऊ लागले आहेत.
लॉकडाऊनची अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी यासाठी डिचोली पोलीस उपअधिक्षक संदेश चोडणकर, निरिक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक व इतर पोलीस कर्मचारी दिवसभर गस्तीवर होते. वाहनांची तसेच लकांची विचारपूस करीत होते. कोणत्याही ठिकाणी गोंधळ किंवा कोणताही अनुचित प्रकार घडल्याची माहिती नाही.