अनेक ठिकाणी सोसाटय़ाचा वारा. न्हावेलीत घरावर झाड पडले.
डिचोली / प्रतिनिधी
काल शुक्र. दि. 10 एप्रिल रोजी संध्याकाळी डिचोली तालुक्मयातील बहुतेक ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होत हलक्मया सरिंचा पाऊस लोकांना अनुभवण्याची संधी मिळाली. ढगाळ वातावरण व सोसाटय़ाचा वारा यामुळे वातावरणातला उकाडा कमी झाल्याचे दिसून आले. जोरदार वाऱयामुळे भरोणीवाडा न्हावेली येथे एका घरावर झाड पडण्याची घटना घडली.
शुक्रवारी संध्याकाळी पावसाची शक्मयता वेधशाळेने वर्तविली होती. त्याप्रमाणे डिचोली तालुक्मयातील विविध भागात संध्याकाळी 5 नंतर पावसाचे ढग दाटून आले. व जोरदार वारे वाहे लागले. या वाऱयाबरोबरच किंचितसा वीजेचा लखलखाट आणि गडगडाटही सुरू होता. त्याचवेळी पावसाची रिपरिप सुरू झाली. पाऊस तसा मोठय़ा जोराने पडला नसला तरी वातावरणातील उकाडय़ाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले.
संध्याकाळी आलेल्या जोरदार वाऱयामुळे भरोणीवाडा न्हावेली येथील नितीन गावस यांच्या घरावर आंब्याचे मोठे झाड कोसळल्याने त्यांचे बरेच नुकसान झाले. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. त्याचप्रमाणे खाजन चावडी पाळी, रूमडवाडा पाळी येथेही घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले. दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी बचावकार्यात भाग घेतला. तर काही उर्वरीत काम आज शनिवारी पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.