डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील जिल्हा पंचायतीच्या 4 मतदारसंघातून एकूण 75 टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक मतदान पाळी मतदारसंघात 77.39 टक्के इतके झाले. तर सर्वात कमी मतदान कारापूर सर्वण या मतदारसंघात 63.73 टक्के इतके झाले. लाटंबार्से मतदारसंघात 76.43 टक्के तर मये मतदारसंघात 72.50 इतके मतदान झाले. तालुक्मयातील एकूण 59007 पैकी 42700 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 100 मतदानकेंद्रांमधून मतदान प्रक्रिया पार पडली.
डिचोली तालुक्मयातील लाटंबार्से, मये कारापूर सर्वण व पाळी या चार जिल्हा पंचायत मतदारसंघातून या निवडणुकीला मतदारांनी समाधानकारक प्रतिसाद दिला. सकाळीच काही प्रमाणात मतदान झाले. तर नंतर मतदानकेंद्रांवर क्वचितच रांगा दिसून येत होत्या. संध्याकाळच्या सत्रात चारही मतदारसंघांमध्ये चांगलेच मतदान झाले. सर्व उमेदवारांचे कार्यकर्ते जास्तीत जास्त लोकांना मतदानकेंद्रांवर आणण्याच्या कामात गुंतलेले दिसून आले. डिचोली तालुक्मयातील सर्व मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान पार पडले. केवळ कारापूर सर्वण मतदारसंघातील म्हावळींगे या गावातील दोन मतदानकेंद्रांमधील 1162 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी मामलेदार प्रवीणजय पंडित संपूर्ण तालुक्मयात मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेऊन होते.
पाळी मतदारसंघात सर्वाधिक 88.39टक्के मतदान.
पाळी या साखळी मतदारसंघातील जि. पंआयत मतदारसंघात सर्वाधिक 88.39 टक्के मतदान झाले. एकूण 14202 पैकी 10991 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 6990 पैकी 5589 पुरूष मतदारांनी तर 7212 पैकी 5402 महिला मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात एकूण 29 मतदानकेंद्रांतून मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात भाजपतर्फे गोपाळ सुर्लकर, काँग्रेसतर्फे सुर्यकांत गावडे व अपक्ष उमाकांत जल्मी असे तीन उमेदवार रिंगणात आहेत.
लाटंबार्से मतदारसंघात 76.43 टक्के मतदान
लाटंबार्से या मतदारसंघात 76.43टक्के मतदान झाले. एकूण 14203 पैकी 10856 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 7066 पैकी 5552 पुरूषांनी तर 7137 पैकी 5304 महिला मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात एकूण 22 मतदानकेंद्रांमधून मतदान प्रक्रिया हाती घेण्यात आली. या मतदारसंघात भाजपतर्फे श्रुती घाटवळ, काँग्रेस पक्षातर्फे गोविंद मांदेकर व अपक्षपणे प्रदीप रेवोडकर हे तीन उमेदवार रिं?गणात आहेत.
मये मतदारसंघात 72.50 टक्के मतदान
मये या जिल्हा पंचायत मतदारसंघात 72.50 टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघातील एकूण 15409 पैकी 11171 मतदारांनी मतदान केले. 7554 पैकी 5643 पुरूष मतदारांनी तर 7855 पैकी 5528 महिलांनी मतदान केले. या मतदारसंघात 24 मतदानकेंद्रांमधून मतदान प्रक्रिया झाली. या मतदारसंघात भाजपतर्फे शंकर चोडणकर, काँग्रेसतर्फे प्रसाद चोडणकर, मगोतर्फे नारायण तारी, अपक्ष प्रेमेंद्र शेट, राजेश कळंगुटकर, कृष्णा वळवईकर, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे दिपकुमार मापारी असे सात उमेदवार रिंगणात आहेत.
कारापूर सर्वण मतदारसंघात सर्वात कमी 63.73 टक्के मतदान.
कारापूर सर्वण या मतदारसंघात तालुक्मयातील सर्वात कमी 63.73 टक्के मतदान झाले. एकूण 15193 पैकी 9682 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 7498 पैकी 5002 पुरूषांनी तर 7695 पैकी 4680 महला मतदारांनी मतदानाच हक्क बजावला. या मतदारसंघात एकूण 25 मतदानकेंद्रांमधून मतदान प्रक्रिया पार पडली. य मतदारसंघात भाजपतर्फे महेश सावंत, मगोतर्फे योगेश पेडणेकर, अपक्ष अजय नाईक व मेघना येंडे असे चार उमेदवार रिंगणात होते.
23 पैकी 3 कोवीड रूग्णांनी केले मतदान डिचोली तालुक्मयातील चारही मतदारसंघांमध्ये एकून 23 कोवीड रूग्ण सध्या सक्रिय असून त्यापैकी केवळ 3 रूग्णांनी पिपीई किट परिधान करून मतदान केले. लाटंबार्से मतदारसंघातील 10 पैकी 2 तर मये मतदारसंघातील 6 पैकी 1 रूग्णाने पिपीई किट परिधान करून मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. तर पाळी (4 रूग्ण) व कारापूर सर्वण (3 रूग्ण) या मतदारसंघातील एकही कोवीड रूग्णाने मतदान केले नाही.