डिचोली/प्रतिनिधी
राज्यातील 11 नगरपालिकांची निवडणूक उंबरठय़ावर असतानाच सरकारतर्फे काही दर्जा वाढलेल्या नगरपालिकांची प्रभागसंख्या वाढविण्याचे सुतोवाच केल्याने या नगरपालिकांपैकी डिचोली नगरपालिकेचेही प्रभागसंख्या वाढण्याची शक्मयता निर्माण झाल आहे. यामुळे सध्या कार्यकाळ संपून नव्याने निवडणुकीस सज्ज होणाऱया माजी नगरसेवकांचे दाबे दणाणले आहे. निवडणूक विभागातर्फे सदर प्रक्रिया हाती घेण्यात येण्याची शक्मयता असून तसे झाल्यास निवडणुकीला काही प्रमाणात विलंब होण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
डिचोली नगरपालिकेचा दर्जा बी क्लास असून या नगरपालिक क्षेत्राची मतदारसंख्या आता सुमारे 13 हजारांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या 2015 च्या निवडणुकीत सदर संख्या 12 हजारांपेक्षा काहीशी कमी होती. अनेक वर्षांनंतर 2015 च्या नगरपालिका निवडणुकांपूर्वी डिचोली नगरपालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यावेळी प्रभाग 10 होते. ती संख्या वाढवून 12 करण्यात आली होती. त्या पुनर्रचनेत सर्व 12 ही प्रभागांमध्ये समान मतदारसंख्या ठेवण्याचा निवडणूक विभागाकडून करण्यात आला होता.
पुनर्रचनेनंतर प्रभाग क्र. 1 मध्ये 1053, प्रभा क्र. 2 मध्ये 1046 प्रभाग क्र. 3 मध्ये 988, प्रभाग क्र. 4 मध्ये 1037, प्रभाग क्र. 5 मध्ये 1007, प्रभाग क्र. 6 मध्ये 977, प्रभाग क्र. 7 मध्ये 1015, प्रभाग क्र. 8 मध्ये 1029, प्रभाग क्र. 9 मध्ये 953, प्रभाग क्र. 10 मध्ये 889, प्रभाग क्र. 11 मध्ये 1009 व प्रभाग क्र. 12 मध्ये 949 अशा प्रकारे मतांची विभागणी करून प्रभाग रचना करण्यात आली होती. संपूर्ण डिचोली नगरपालिका क्षेत्रातील 12 ही प्रभागांची मिळून एकूण 11951 इतकी मतदारसंख्या 2015 च्या नगरपालिका निवडणुकीत होती.
सदर मतदारसंख्या गेल्या पाच वर्षांमध्ये वाढली असून ती सुमारे 13 हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या निवडणुकीत गेल्यावेळी प्रभागरचनेत बसविण्यात आलेली मतांची संख्या वर खाली झाली आहे. त्यामुळे सध्याची मतदारसंख्या वाढल्याने आणि डिचोली नगरपालिकेचा दर्जा बी क्लास असल्याने सरकारने केलेल्या सुतोवाचाप्रमाणे प्रभाग संख्या वाढण्याच्या शक्मयतेला दुजोरा मिळतो.
या संदर्भात डिचोलीत नवा सोमवार उत्सवाला देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी या प्रतिनिधीने संवाद साधताना, या निवडणुकीत डिचोलीतील प्रभागसंख्या वाढण्याच्या शक्मयतेवर प्रश्न केला असता, मतदारसंख्येप्रमाणे डिचोलीत प्रभागसंख्या वाढविण्यास वाव आहे. डिचोली नगरपालिका हि बी क्लास दर्जाची असल्याने प्रभाग वाढायला हवे. असे ते म्हणाले. मात्र त्यामुळे प्रभाग फेररचनेस वेळ लागणार आणि त्यामुळे निवडणुकीला विलंब होणार, असा प्रश्न विचारला असता, सदर प्रक्रिया वेगवानपणे हाती घेऊन ठरलेल्या वेळेत जर संपुष्टात आणली तर निवडणुकीला जास्त विलंब होणार नाही. स्थानिक निवडणुक विभागाचीही त्यासाठी तयारी असणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती माळविण्याचा प्रयत्न केला असता, डिचोली निवडणूक विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाने डिचोली नगरपालिकेतील सर्व प्रभाग आणि मतदारसंख्येची माहिती मागवून घेतली असल्याचे समजले. सध्या डिचोली नगरपालिका क्षेत्रात असलेल्या 12 प्रभागांमधील मतदारसंख्येवरच निवडणूक प्रक्रिया घेतल्यास स्थानिक निवडणूक विभाग ऐनवेळी सुध्दा तयार आहे, असे समजले. परंतु जर प्रभाग फेररचनेची प्रक्रीया हाती घेतल्यास सध्या बसलेला संपूर्ण साचा हलणार आणि मतांची विभागणी आणि भौगोलिकदृष्टय़ा प्रभागांची रचना करण्यात वेळ जाणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत डिचोली नगरपालिकेत असलेली 12 हि प्रभागसंख्या सम आहे पालिका प्रभागांची संख्या कायद्याप्रमाणे विषम असणे अनिवार्य आहे. मात्र गेल्या वेळी सदर संख्या 10 ची 12 करून पुन्हा सम ठेवण्यात आली होती. त्यास अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे यावेळी जर डिचोली नगरपालिकेची प्रभाग फेररचना झाल्यास ती 14 पेक्षा 15 करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी केली आहे.
डिचोली नगरपालिकेत सध्या असलेल्या सर्व 12 प्रभागांमध्ये नुकताच कार्यकाळ संपलेल्या माजी सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांमध्ये गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर कार्यकाळ संपल्यानंतरही आपले प्रभागातील काम चालूच ठेवले आहे. आपल्या प्रभागांत सध्या समाविष्ट असलेल्या सर्व भागांमधील लोकांची कामे सध्या हे माजी नगरसेवक आणि सध्याचे इच्छुक उमेदवार करीत आहेत. त्यामुळे जर प्रभाग फेररचना होऊन संबंधित प्रभागामधील काही भाग वगळून नवे भाग समाविष्ट करण्यात आल्यास माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांचीही गोची होऊ शकते. त्यासाठी काही घटकांना या निवडणुकीत हि प्रभाग फेररचना न झालेली बरी अशी भावना झाली आहे.