चतुर्थीच्या बाजारानिमित्त नगरपालिकेतर्फे व्यवस्थापन. पार्किंग बाजाराबाहेर राहणार. कोवीड विषयी बाजारात जागृती केली जाणार. कोवीडचे दोन डोस सक्तीचे. मास्क परिधान न करणाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई.
डिचोली/प्रतिनिधी
गणेश चतुर्थीनिमित्त भरणाऱया बाजारात खरेदीसाठी येणाऱया ग्राहकांना बेशिस्त वाहतूक आणि पार्किंगचा त्रआस होऊ नये यासाठी आज बुध. दि. 8 सप्ट?. पासून बाजारात प्रवेश करणारे सर्व मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद केले जाणार आहे. यावषी गणेश चतुर्थीच्या बाजाराची सर्व व्यवस्था बाजारातच करण्यात आली असून कोवीड तत्वाचे पालन आणि जागृती कडकपणे करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष कुंदन फळारी व मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी सांगितले.
गेल्यावषी कोवीडच्या रूग्णसंख्येत ऐन गणेश चतुर्थीच्या काळातच वाढ होऊ लागल्याने डिचोली नगरपालिकेतर्फे बाजाराबाहेर माटोळी व इतर चतुर्थीच्या आवश्यक सामानाला जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. शहरातील विविध ठिकाणी हे सामान थाटण्यात आले होते. त्यामुळे बाजारातील गर्दी कमी झाली होती. ते कोवीडच्या दृष्टीकोनातून चांगले झाले होते. मात्र चतुर्थीचा बाजार मुख्य बाजाराबाहेर भरल्याने त्याचा फटका बाजारातील इतर व्यापाऱयांना बसला होता. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावषी बाजारातील व्यापाऱयांनी सर्व कोवीडची मार्गदर्शक तत्वे कडकपणे पाळत बाजार मुख्य बाजारातच भरविण्यासाठी नगरपालिकेकडे आग्रह धरल्यानंतर यावषीचा संपूर्ण बाजार बाजारतच भरविण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला.
या बाजार व्यवस्थापनात बाजारात येणारे सर्व मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सकाळीपासून बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे बाजारात बेशिस्त वाहतूकीवर निर्बंध येणार. तसेच बाजारात अस्ताव्यस्त पार्किंग होणार नाही. लोकांना बिनधास्तपणे बाजारात फिरण्याचु संधी मिळणार. कोवीड महामारी लक्षात घेत बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेतर्फे लोकांना जागृत करण्यासाठी चार पाच ठिकाणी ध्वनिक्षेपक बसवून मास्क परिधान करण्याची सुचना केली जाणार आहे. बाजारात नगरपालिकेचे अधिकारी तसेच पोलीसही तैनात असणार. मास्क न वापरणाऱयांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
डिचोली नगरपालिकेने बाजारात विपेत्यांना बसण्यासाठी सामाजिक अंतर ठेऊन खुणा केल्या आहेत. त्याच नियमांप्रमाणे विपेत्यांना बसविण्यात येणार आहेत. तसेच गोव्याबाहेरून येणाऱया विपेत्यांना कोवीड प्रतिबंधक लसीचे दोन डोस बंधनकारक आहे. दोनडोस घेतलेल्यांनाच बाजारात सामान विक्रीसाठी बसण्याची मुभा असणार. असा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे.
नगरपालिकेला लोकांनी सहकार्य करावे
कोवीड महामारी असली तरी लोकांसाठी गणेश चतुर्थी हा सण तसा महत्वाचाच आहे. या सणामुळे मोठय़ा संख्येने विपेत्यांना व्यवसाय मिळतो. तसेच डिचोली व परिसरातील ग्राहकांना सामान खरेदीत त्रास होऊ नये यासाठी यावषी बाजारतच चतुर्थीच्या सामानाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. कोवीड विषयी जागृती केली जणारच आहे. मात्र ती आपली स्वतःची जबाबदारी या उद्देशाने प्रत्येकाने नगरालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी केले आहे.