डिचोली/प्रतिनिधी
डिचोली बाजारात गणेश चतुर्थीचवया खरेदीसाठी येणाऱया ग्राहकांची चांगली सोय व्हावी व त्यांना बाजारात मुक्तपणे संचार करण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी डिचोली नगरपालिकेने चोख बंदोबस्त आखला आहे. बाजारात प्रवेश करणारे सर्वच मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आलेले असून बाजारात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना बाजारात विस्कळीतपणे फिरण्याची संधी मिळाली आहे.
सध्याच्या कोवीड संसंर्गाचा धोका लक्षात घेऊन डिचोली नगरपालिकेतर्फे बाजारात गर्दी होऊ नये याची नगरपालिकेने पूर्ण दक्षता बाळगली आहे. बाजारात भरणाऱया माटोळीच्या बाजारामुळे चतुर्थीला दोन दिवस बाकी असताना बाजारात मोठय़ा प्रमाणात खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असते. त्यामुळे कोरोना संसंर्गाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नगरपालिकेने शहरातील चार जागा माटोळीच्या बाजारासाठी निश्चित केल्या आहेत. शांतादुर्गा हायस्कुलच्या समोरील खुली जागा, हिराबाई झांटय़? स्मृती सभागृहाच्या समोरील पार्कींगची खुली जागा, शेटय़? गार्डन व बोर्डे वडाकडे येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या समोरील जागा अशा चार ठिकाणी माटोळीचा बाजार भरणार आहे.
याठिकाणी लोकांनी स्वतःला आवश्यक असलेले सर्व माटोळीचे सामान खरेदी करावे. माटोळीचे सामान बाजारात विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. बाजारात कपडय़ां?चे फिरते विपेत्यांना आपली दुकाने थाटण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच काही गावठी भाजी विक्री करणाऱया विपेत्यांना बाजारात बसण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच डिचोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात माटोळी व इतर प्रकारचे सामान विक्रीसाठी संधी दिली जाणार आहे. असे नगराध्यक्ष सतीश गावकर यांनी सांगितले.
कोवीड महामारीचा हा काळ असल्याने प्रत्येक माणसाने आपली व इतरांची काळजी राखणे आवश्यक आहे. गणेश चतुर्थी निर्विघ्नपणे साजरी करण्यासाठी सरकारने विविध प्रकारची मार्गदर्शक तत्वे अंमलात आणली आहे. त्या मार्गदर्शक तत्वा?ची अंमलबजावणी करताना लोकांनी बाजारात आपली खरेदी करावी. डिचोली नगरपखलिकेनेही लोकांच्या काळजीपोटी बाजारात विविध रचना केल्या आहेत. त्यांचीही जाणीव ठेवताना योग्य खबरदारी घेत खरेदी करावी व नगरपालिकेच्या या रचनेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सतीश गावकर यांनी केले आहे.