डिचोली / प्रतिनिधी
राज्य विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज सादर केला. राज्यात सध्या सरकारकडून झालेली प्रगती आणि विकास पाहता यापुढील सरकार हे भाजपचेच असणार आणि डिचोली तालुक्यातील तीन्ही मतदारसंघ भाजप जिंकणार असा विश्वास राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस व इतरांची उपस्थित होते.