डिचोली मतदारसंघातील उमेदवारीचा गुंता कायम
डिचोली/प्रतिनिधी
विधानसभा नावडणुका जवळ येत असल्याने सध्या प्रत्येक मतदारसंघातील राजकीय वातावरण तापत आहे. डिचोली तालुक्मयातील महत्वाच्या डिचोली या मतदारसंघात सध्या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झालेला आहे. विद्यमान सभापती तथा आमदार राजेश पाटणेकर यांच्याबरोबरच प्रदेश महिला सरचिटणीस तथा माजी जिल्हा पंचायत सदस्या शिल्पा नाईक यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. तर या मतदारसंघातील युवानेते तथा पक्षाचे एक नि÷ावंत कार्यकर्ते चंदन परब यांनीही पक्षाकडे आपली इच्छुक उमेदवार म्हणून दावेदारी केल्याने त्यांचेही नाव चर्चेत दिसत आहे. सर्व उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यासाठी पक्षाकडे जोरदार मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी कोणाला जाहिर होणार या संभ्रमात पक्ष कार्यकर्ते आहेत.
डिचोली मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर डिचोलीत भाजपच्या कार्याला जोरदार स्फुरण चढले आहे. हिराबाई झां?टय़? स्मृती सभागृहात झालेल्या या मेळाव्यास लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा मेळावा यशस्वी झाला असे म्हणता येईल. परंतु आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डिचोली मतदारसंघातील भाजपची उमेदवारी कोणाला ? डिचोली मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे मानले जाते. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला प्रथम संधी असल्याचीच भावना भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. परंतु उमेदवारी कोणाला मिळणार या प्रश्नावरच सर्वकाही सध्या ठप्प झालेले आहे.
आतापर्यंत भाजपला डिचोलीत राजेश पाटणेकरांमुळेच संधी.
या मतदारसंघात भाजपला तीनवेळा केवळ राजेश पाटणेकर यांच्यामुळेच राज्य करण्याची संधी मिळाली आहे, हेही खरेच आहे. परंतु यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्या शिल्पा नाईक यांनी आपल्या दावेदारीला जोर धरला आहे. तसेच चंदन परब यांनीही आपल्या परिने लहान सहान बैठका सुरू केल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार निवडीत पक्षश्रे÷ाrंनाही सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे, असेच दिसते. 2002 ते 2007 आणि 2007 ते 2012 या दोन कार्यकाळांसाठी भाजपतर्फे आमदार म्हणून सेवा केलेल्या राजेश पाटणेकर यांनी 2012 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात जाण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला होता. आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ढवळलेल्या राजकारणात नरेश सावळ यांना डिचोलीतील मतदारांनी संधी दिली. भाजपतर्फे निवडणूक रिंगणात उतरविलेले मनोहर शिरोडकर हे तिसऱया स्थानी तर काँग्रेसतर्फे राजेश पाटणेकर हे दुसऱया स्थानी राहिले होते.
जिल्हा पंचायत सदस्य असताना कामांचा धडाका
त्यावेळी भाजपकडे डिचोलीत तसे नेतृत्व नव्हते. मनोहर शिरोडकर हे पराभूत उमेदवार तथा भाजप डिचोली मतदारसंघ मंडळाचे अध्यक्ष होते. त्या काळातही भाजपशी एकनि÷ राहिलेल्या तत्कालीन जिल्हा पंचायत सदस्या शिल्पा नाईक यांनी सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या बळावर कामांचा जोरदार धडाका लावला होता. अनेकांचे सरकारी रोजगार त्यांनी केले. त्यावेळचे आमदार नरेश सावळ व जि. पं. सदस्या शिल्पा नाईक यांच्यातील राजकीय युध्द चांगलेच रंगले होते. या युध्दातही त्यांनी आपला जोर कायम ठेवला होता. परंतु 2015 च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत नाईक यांचा पराभव झाल्याने त्या राजकीय दृष्टय़ा जरी पिछाडीवर गेल्या तरी त्यांनी आपल्या पक्ष कार्याचा वेग कमी केला नव्हता.
उमेदवारी नाकारल्यानंतरही पक्षाबरोबर
2015 सालीच झालेल्या नगरपालिका निवडणुकीपूर्वी राजेश पाटणेकर यांनी पुन्हा भाजप प्रवेश केल्याने भाजप पक्षांतर्गत राजकारणालाच जोर आला होता. दोन्ही नेत्यांनी विधानसभा उमेदवारीवर डोळा ठेवून कार्याला जोर दिला होता. परंतु त्यावेळी राजेश पाटणेकर यांच्या गळय़ात उमेदवारी पडली आणि त्यांनी स्वतः निवडून येण्याची क्षमता सिध्द करून दाखवली. उमेदवारी नाकारल्याने नाराज बनलेल्या शिल्पा नाईक यांनी आपण पक्षाबरोबरच आहे, परंतु पाटणेकर यांच्यासाठी काम करणार नसल्याचे जाहिर केले होते. मात्र त्यांना तत्कालीन संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांच्या आग्रहास्तव निवडणुकीला अवघेच दिवस असताना प्रचारासाठी उतरावे लागले होते. त्यावेळी त्यांनी आपली पक्षनि÷ा सिध्द केली होती.
उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार आग्रह.
राजेश पाटणेकर व शिल्पा नाईक यांच्याकडून कामाला जोर.
गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार म्हणून राजेश पाटणेकर यांनी पक्षाचे कार्य तसेच आपल्या आमदारकीचे कर्तव्य सुरूच ठेवताना डिचोलीच्या विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष कर्यातही अग्रेसर राहताना पक्षाचे काम पध्दतशीरपणे पुढे नेण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असून उमेदवारी पाटणेकर यांनाच मिळणार असा त्यांना विश्वास आहे. त्याचबरोबर शिल्पा नाईक यांनी आपल्या कार्याचा जोर चालूच ठेवला आहे. प्रदेश महिला मोर्चाच्या सरचिटणीसपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा वेग वाढविला होता. आज डिचोली मतदारसंघात आपल्या उमेदवारीची दावेदारी ठेवताना त्यांनी घरोघरी भेटी देत प्रचारावर भर दिला आहे. त्यांच्याही कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. 2017 साली नाकारलेली उमेदवारी या निवडणुकीत देऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष श्रे÷ाrंकडे केली आहे. त्यामुळे डिचोलीच्या उमेदवारीवर पक्षाला बराच विचार आणि अभ्यास करालया भाग पडणार आहे.