बाजारात ग्राहकांची झुंबड. सामानांचे दर.. वाहतुकीची कोंडी. सर्वत्र गणेश चतुर्थीच्या तयारीला वेग.
डिचोली/प्रतिनिधी
केवळ एका दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीच्या तयारीसाठी सध्या शहरातील बाजारांमध्ये लोकांची बरीच झुंबड पहायला मिळत आहे. डिचोली व साखळी बाजारात माटोळीचे सामान मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाल्याने बाजार चतुर्थीच्या उत्साहात फुलून गेला आहे. चतुर्थीच्या तयारीला सर्व थरावरील तयारीला वेग आलेला आहे.
निसर्गदेवतेची पूजा असलेल्या गणेश चतुर्थीतील खास आकर्षण असलेल्या माटोळीचे सामान मोठय़ा प्रमाणात डिचोली व साखळी बाजारात दाखल झाले असून ते खरेदी करण्यासाठी लोकांनी झुंबड केली होती. माटोळीच्या सामानांचे दर सध्या बरेच चढलेले आहे. तरीही लोकांकडून या सामानाची खरेदी होत आहे. दरवषी माटोळीला बांधण्यात आलेल्या वस्तू यावेषी चुकू नये यासाठी लोकांकडून महाग असूनही हे सामान खरेदी केले जात आहे.
माटोळीच्या बाजारात माटोळीला बांधण्यात येणाऱया “घागऱया” यावषी बऱयाच महागलेल्या दिसून आल्या. शंभर रूपयांना एक जुडी असा दर चालत होता. तर इतरही सामानांच्या जुडय़ा पन्नास रूपयांच्या खाली नव्हत्या. त्याचबरोबर कांगला, माट्ट?ला, हरणी व इतरही वनस्पती, फळे य बाजारात उपलब्ध झाली आहे. त्यांचेही दर गगनाला भिडलेले आहेत.
या माटोळीच्या बाजारामुळे डिचोली व साखळी बाजारातीव वाहतुकीत बदल करण्यात आले होते. त्यामुळे लोकांची काहीच प्रमाणात धांदल उडाली. बाजारात थेट वाहने सोडण्याचे बंद केल्याने लोकांना बाजाराबाहेर आपली वाहने पार्क करावी लागत होती. त्यामुळे वाहनचालक हवी त्या ठिकाणी आपली वाहने पार्क करून जात असल्याने इतर वाहनांची गोची होत होती. हिच परिस्थिती आजही (मंगळवारी) उपस्थित होणार आहे.
परंतु या वाहतूक व्यवस्थेचा लाभ बाजारात येणाऱया ग्राहकांना झाला. बाजारात वाहने नसल्याने लोकांना हातात सामानाच्या गोण्या घेऊन बिनधास्त फिरता आले. त्यामुळे विपेत्यांनाही वाहनांपासून आपला माल सांभाळण्यची गरज पडली नाही. हिच व्यवस्था आज मंगळवारीही चालूच ठेवली जाणार असल्याचे सांगणात आले.