फेब्रुवारी महिन्यात 7 कोटींचे वीजबिल जमा : डिजिटल व्यवहारांमध्ये बेळगाव शहर जिल्हय़ात आघाडीवर
प्रतिनिधी /बेळगाव
देशात डिजिटल क्रांती झाली आणि प्रत्येकजण खिशातून रक्कम घेऊन फिरण्याऐवजी मोबाईलमधून डिजिटल मनी घेऊन फिरू लागला. घरबसल्या साहित्याची ऑर्डर देणे, खाद्यपदार्थ मागविणे, याचबरोबर विजेसह इतर बिले भरणे सोयीचे ठरत आहे. फेब्रुवारी महिन्यात आजतागायत बेळगाव व खानापूर तालुक्मयात 7 कोटी रुपयांचे वीजबिल हेस्कॉमकडे जमा झाले आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये बेळगाव शहर जिल्हय़ात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी विजेचे बिल भरणे हे काहीशी जिकिरीची व वेळकाढू प्रक्रिया होती. शहरात हेस्कॉमच्या बिल भरणा केंदावर जाऊन अथवा ‘बेळगाव वन’ कार्यालयात जाऊन ग्राहकाला बिल भरावे लागत होते. यासाठी ग्राहकांचा वेळही वाया जात होता व रांगेमध्ये उभे रहावे लागत होते. चिल्लर पैसे मिळविण्यासाठीही वादावादी होत होती. ग्रामीण भागात ग्राम पंचायत अथवा गावातील मोठय़ा मंदिरांमध्ये ठरावीक दिवशी बिल भरून घेतले जात होते. यासाठी 1 ते 2 कर्मचारी या कामावर लागत होते. परंतु सध्या ऑनलाईनमुळे ही संपूर्ण प्रक्रियाच बदलली गेली आहे.
हेस्कॉमने आपल्या वेबसाईटसह इतर ऍप्लिकेशनवर बिल भरण्याची संधी ग्राहकांना दिली. हेस्कॉमने बिल अपडेट करताच संबंधित ऍप्लिकेशनकडून त्या ग्राहकाच्या मोबाईलवर मिळते. यामुळे वेळेत वीजबिल भरणे सोयीचे ठरते. केवळ बेळगाव शहरात 52 हजार 172 ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरत 6 कोटी 14 लाख 44 हजार रुपयांचा महसूल हेस्कॉमकडे जमा केला आहे. बेळगाव तालुक्मयाने 1 कोटी 6 लाख तर खानापूर तालुक्मयामध्ये 33 लाख रुपये ऑनलाईन महसूल जमा झाल्याची नोंद हेस्कॉमकडे आहे.
खानापूर तालुक्यात जागृतीची गरज
खानापूर तालुका तसा दुर्गम असल्याने अद्याप ऑनलाईन सेवांबद्दल तितकीशी माहिती नाही. त्यामुळे ऑनलाईन बिल जमा करण्यामध्ये हा तालुका अद्याप पिछाडीवर आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असूनही बिल भरण्याबाबत माहिती नसल्यामुळे बिल भरले जात नाही. फेब्रुवारी महिन्यात केवळ 33 लाख रुपयांचे ऑनलाईन विजेचे बिल हेस्कॉमकडे जमा झाले आहे. ही रक्कम सर्वात कमी असल्याचे दिसून येत आहे.
खबरदारीही तितकीच गरजेची
फोन पे, गुगल पे, पेटीएम, भारत पे, फ्रिचार्ज, ऍमेझॉन पे यासारखी ऍप्लिकेशन्स ही थर्डपार्टी म्हणून कार्यरत असतात. बऱयाचवेळा या ऍल्पिकेशनच्या तांत्रिक दोषामुळे बिल भरले जात नाही. परंतु, खात्यातून रक्कम मात्र कापली जाते. अशी समस्या आल्यास 24 तासांमध्ये संबंधित बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होणे आवश्यक असते. बऱयाचवेळा ग्राहकाला वाटते आपले बिल भरले गेले आहे. परंतु, ती रक्कम हेस्कॉमच्या सर्व्हरला जमा झालेली नसल्याने कर्मचारी व ग्राहकांमध्ये वादावादीचे प्रकार घडतात.
फेब्रुवारी महिन्यात जमा झालेले वीजबिल
विभाग | जमा झालेली रक्कम |
बेळगाव शहर | 6,14,44,475 |
बेळगाव तालुका | 1,06,50,000 |
खानापूर तालुका | 33,26,000 |
असे भरा ऑनलाईन विजेचे बिल
हेस्कॉमच्या वेबसाईटवर www.hescom.com त्या ठिकाणी शहरी अथवा ग्रामीण याची निवड करून ऑनलाईन पेमेंट करून बिल भरले जाऊ शकते. बिल भरताना बिलावरील ग्राहक क्रमांक घालणे आवश्यक असते. फोन पे, गुगल पे, पेटीएम, भारत पे, फ्रिचार्ज, ऍमेझॉन पे वरूनही बिल भरता येते. ग्राहक क्रमांक घालून येथून क्षणार्धात पेमेंट केले जाऊ शकते. ग्राहक संख्या घातल्यानंतर संबंधित ग्राहकाची माहिती योग्य असेल तरच बिल ग्राहकांनी भरायचे.
ऑनलाईन बिल भरणाऱयांची संख्या वाढली
हेस्कॉमने घरबसल्या विजेचे बिल भरण्याची मुभा दिली असल्याने ग्राहक ऑनलाईन विजेचे बिल भरीत आहेत. ऑनलाईन बिल भरणाऱयांची संख्या वाढली असल्याने काऊंटरवर येऊन बिल भरणाऱयांची संख्या कमी झाली आहे. बेळगाव व खानापूरचा विचार करता महिन्याला 8 ते 9 कोटी रुपयांचे बिल ऑनलाईन भरले जात असल्याची माहिती एम. टी. अप्पण्णावर यांनी दिली.
-एम. टी. अप्पण्णावर (कार्यकारी अभियंते, हेस्कॉम)