मुंबई –
आजकाल सर्वच व्यवहार डिजिटल माध्यमातून होत असून उत्तरोत्तर यात वाढ होताना दिसणार आहे. दुसरीकडे डिजिटल स्वरूपातल्या जाहिरातींच्या संख्येत वर्षअखेरपर्यंत 20 टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2020 मध्ये डिजिटल जाहिरातींच्या संख्येत 2019 च्या तुलनेत 15 टक्के वाढ झाली आहे. 16 हजार 782 कोटी रुपयांच्या डिजिटल जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. यात यंदा 20 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. कोरोनाकाळात डिजिटल जाहिरातींवर परिणाम जाणवला होता. पण आता वृद्धी होताना दिसते आहे.