2025 पर्यंत 71 टक्क्यावर पोहचणार, पेमेंटमध्ये चीननंतर भारतच
नवी दिल्ली
सध्याला ऑनलाइन व्यवहाराला गती आली असून येणाऱया काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटच्या प्रमाणातही वाढ होणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. 2025 पर्यंत डिजिटल पेमेंटचे प्रमाण 71 टक्के राहणार असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या तुलनेमध्ये रोख आणि चेकच्या माध्यमातून होणारे पैशाचे देवाणीचे व्यवहार( पेमेंट) 28 टक्के राहणार आहेत. एसीआय वर्ल्डवाईड यांनी यासंदर्भातला अहवाल नुकताच सादर केला आहे. सदरील अहवालात वरील पेमेंट वाढीची नोंद करण्यात आली आहे. 2020 मध्ये डिजिटल पेमेंटमध्ये चीननंतर भारत व्यवहार जास्त करताना दिसतो आहे. 2020 मध्ये चीनने 25 अब्ज पेमेंटचे व्यवहार केले आहेत त्या तुलनेमध्ये भारताने 15 अब्ज पेमेंटचे व्यवहार केले आहेत. येणाऱया काळातही डिजिटल माध्यमातून पेमेंटचे प्रमाण वाढणार आहे.